घरमनोरंजन'१२ वर्षे गप्प होतो परंतु आता बसणार नाही,' राज कुंद्राने पहिल्या पत्नीबाबत...

‘१२ वर्षे गप्प होतो परंतु आता बसणार नाही,’ राज कुंद्राने पहिल्या पत्नीबाबत केला खळबळजनक खुलासा

Subscribe

'दोन्ही कुटुंब तुटली, त्यांनी कसलाचं विचार केला नाही.'

बॉलिवूडमधील परफेक्ट जोडी म्हणून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राकडे पाहिले जाते. परंतु शिल्पा राज कुंद्रातची दुसरी पत्नी आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा आणि त्यांची पहिली पत्नी कविता यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिल्पा शेट्टीमुळेच राज आणि तिचे लग्नाचे नाते तुटले असे वक्तव्य केलेला कविताचा एक खुप जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियार तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे राज कुंद्रानेही आपल्या पहिल्या पत्नीबाबत मौन सोडले आहे. तसेच पहिल्या पत्नीबाबत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

- Advertisement -

एका मुलाखतीत राज कुंद्राने गेली १२ वर्षे गप्प होतो परंतु आता बसणार नाही असे म्हणत त्याचा पहिल्या पत्नीसोबतचे नाते जगजाहीर केले आहे. यावर बोलताना राज कुंद्रा म्हणाला की, मी यावर बोलणे अनेकदा टाळले पण आत्ता यासगळ्या गोष्टी सांगत असल्यामुळे मला समाधान वाटत आहे. कारण मी आता सगळे सत्य सांगणार आहे. त्यावेळी आमचे कुटुंब भारतातून युकेला स्थायिक झाले होते. माझे आई, वडील, बहीण आणि तिचा नवरा आम्ही एकत्रच राहत होतो. परंतु याकाळात माझ्या बहीणीच्या पतीसोबत माझी पत्नीचे संबंध होते.   विशेषत: जेव्हा मी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेलो होतो. तेव्हा ती त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत असे. याबाबत अनेकदा माझ्या कुटुंबियांनी, माझ्या ड्रायव्हरने सांगितले पण मी त्यावर विश्वास ठेवला नाही. तर मी दोन्ही कुटुंबांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहायचो. माझ्या बहिणीलाही दोघांच्या संबंधांचा संशय आल्याने तिने पतीला भारतात घेऊन जाणे पसंत केले. परंतु तरीही कविता माझ्या बहिणीच्या पतीच्या संपर्कात होती. त्यांच्यामुळे दोन्ही कुटुंब तुटली, त्यांनी कसलाचं विचार केला नाही.

पुढे कुंद्रा म्हणाला की, यानंतर मी आणि माझी बहिण लंडनला गेलो. माझी बहिण तिनेही यागोष्टीमुळे पती वंशसोबत न राहण्याचा विचार केला आणि ती देखील कवितासोबत कायदेशीर घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मी एकदाही तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु मी माझ्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला. पण कविता आणि तिच्या कुटुंबियांनी मला माझ्या मुलीलाही भेटू दिले नाही. मी फक्त ४० दिवस माझ्या मुलीला पाहिलं आहे. तेव्हा कोर्टाने देखील कविताच्या बाजूने निकाल दिला.’ यानंतर जेव्हा मी शिल्पाला भेटलो आणि आमची मैत्री झाली आणि माझ्या माजी पत्नीला हे कळले तेव्हा तिने आपली पैशांची मागणी वाढवली. पैशासाठी तिने खोट्या बातम्या पसरवल्या की, शिल्पामुळे आमचे लग्न मोडले.

- Advertisement -

या मुलाखतीनंतर राज यांनी सांगितले की, शिल्पा माझ्या मुलाखतीनंतर थोडी दु:खी झाली आहे. तिने मला यावर काहीच बोलू नको असे सांगितले होते. परंतु शिल्पाच्या वाढदिवशीच हे व्हायरल होत असल्याने मला धक्का बसवला. पण खरं कधीतरी समोर येणार होतं. असं राज कुंद्रा म्हणाला.


‘सीतेच्या भूमिकेत हिंदूच अभिनेत्री हवी,’ कतरिनाच्या भूमिकेवर नेटकरी संतापले


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -