राज कुंद्रा प्रकरणात अभिनेता उमेश कामतची नाहक बदनामी, शहानिशा न करता वापरला फोटो

अभिनेता उमेश कामत याच्या नामसाधर्म्याखेरीज त्याचे या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे त्याने स्पष्ट केलं आहे.

Raj Kundra case some media used actor Umesh Kamat photos without cross check as accused in raj kundra case
राज कुंद्रा प्रकरणात अभिनेता उमेश कामतची नाहक बदनामी, शहानिशा न करता वापरला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म चित्रीकरण प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली असून या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणा दरम्यान राज कुंद्राचा सहकारी म्हणून काम करणाऱ्या उमेश कामत नावाच्या इसमाला देखील पोलिसांनी बेड्या ठेकल्या आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता उमेश कामत याला नाहक त्रासाला सामोरे जाव लागत आहे. अभिनेता उमेश कामत याच्या नामसाधर्म्याखेरीज त्याचे या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे त्याने स्पष्ट केलं आहे. परंतु अनेक माध्यमांनी संपुर्ण चौकशी न करता राज कुंद्रा प्रकरणात त्याच्या सहकारी आरोपीच्या जागी अभिनेता उमेश कामत याचा फोटो वापरल्याने उमेशला अनेक लोकांचे फोन येण्यास सुरूवात झाली. संबधीत प्रकरणाची दखल घेत उमेशने त्वरीत अधिकृतरीत्या कायदेशीर मार्गाचा वापर करणार असल्याचे जाहीर केलं आहे. तसेच उमेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याला माध्यमाकडून होणाऱ्या बेजबाबदारपणावर संताप व्यक्त केला आहे. उमेशने लिहलं आहे की,“आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्ररकरणातील एक आरोपी उमेश कमात याचा फोटो म्हणून माझा फोटो लावाला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तित,व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल, या प्रकरणी संबधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन” या प्रकरणानंतर उमेशला अनेक लोकांनी पाठिंबा देण्यासाठी फोन व मेसेज येण्यास सुरूवात झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

मराठी सिनेसृष्टीत आजवर अनेक हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि अभिनेता उमेश कामतने नुकतच छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. ‘अजूनही बरसात आहे’ या नव्या कोऱ्या मालिकेतून उमेश आणि मुक्ता बर्वे यांची जोडी प्रेक्षकांना भटीस आली आहे. तसेच मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत.


हे हि वाचा – यंदा मनसेच्या विश्वविक्रमी दहीहंडीला प्रविण तरडेंचा पाठिंबा म्हणाले,१०० टक्के नाचायला येणार