राज कुंद्राने शिल्पाला दिले आहेत अत्यंत महागडे गिफ्ट, किंमत ऐकून चकीत व्हाल

राजने अेकदा शिल्पवर त्याचे किती प्रेम आहे हे जगजाहिर केलं आहे.

raj kundra gave most expensive gift to his wife shilpa shetty
राज कुंद्राने शिल्पाला दिले आहेत अंत्यत महागडे गिफ्ट, किंमत ऐकून चकीत व्हाल

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफिक चित्रपट चित्रीकरण आणि ते विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा राज कुंद्रावर आरोप आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने फेब्रुवारी २०२१ मध्ये राज कुंद्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेचा तपास सुरु झाला होता. या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान कुंद्राचा अश्लील चित्रपट बनवण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी दोघांकडे कोट्यवधींची संपत्ती असून बॉलिवूडमधील सर्वाधीक लोकप्रिय कपल्सच्या यादित दोघांची गणना केली जाते. शिल्पाने राज कुंद्रा सोबत 2009 साली लग्नगाठ बांधली अशातच राज नेहमीच महागडे गिफ्ट देऊन त्याचं प्रेम व्यक्त करत असतो.राज कुंद्राने शिल्पाला दिलेल्या महागड्या गिफ्टची किंमत ऐकून अनेकजण चकीत झाले आहेत.

जगातील सर्वात उंच आणि महागड्या बिल्डिंग बुर्ज खलिफामध्ये राजने शिल्पाला एक आलिशान  फ्लॅट भेट दिला आहे.  19 व्या मजल्यावर हा फ्लोर असून त्याची किंमत चक्क 50 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तसेच 2016 साली शिल्पाने बुर्ज खलिफामधील घर विकले होते.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा

राज आणि शिल्पाच्या साखरपुड्या दरम्यान राजने 20 कॅरेटची डायमंड रींग घालून शिल्पाला चांगलेचं इंम्प्रेस केलं होतं. शिल्पाच्या हातात नेहमीच ही रींग दिसते. तसेच या डायमंड रींगची किंमत 3 कोटी रुपये आहे.

शिल्पा शेट्टी

मुंबईमध्ये स्थित  शिल्पाच्या ‘किनारा’ या घराची किंमंत 3 ते 4 कोरोड रुपयांच्या आसपास आहे. शिल्पाचं नेहमीच मुंबईत एखादं सी-फेसिंग विला खरेदी करण्याच स्वप्न होतं.

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा

युके मध्ये शिल्पाच्या नवावर राजने अत्यंत महागडी जागा खरेदी करत 7 बेडरुमचं एक विला गिफ्ट केलं आहे. शिल्पा नेहमीच संपुर्ण कुटूंबासह युकेमध्ये व्‍हॅकेशन एंजॉय करण्यासाठी जात असते. तसेच या आलिशान विलाचं नाव ‘राजमहल’ असून याची किंमत सुद्धा कोटींच्या घरात आहे.

Shilpa Shetty buys swanky new Mercedes Benz V-Class worth Rs 71.10 lakh. See pics - Movies News

बॉलिवूडमध्ये प्रत्येक स्टारकडे ऑडी, मरसडीज तसेच अनेक माहागड्या कार आहेत. राज कुंद्राने अपल्या पत्नी शिल्पा शेट्टीला अनेक किमती गाड्या भेटवस्तू म्हणून दिल्या आहेत. यामध्या बीएमडबल्यू जेड 4 देखील समावेश आहे.


हे हि वाचा – शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक; पॉर्नोग्राफिक चित्रपट चित्रीकरणाचा आरोप