Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम Raj Kundra Case: गहना वशिष्ठला कोर्टाचा दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीनावर ६ ऑगस्टला...

Raj Kundra Case: गहना वशिष्ठला कोर्टाचा दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीनावर ६ ऑगस्टला सुनावणी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. या प्रकरणी राज कुंद्रासह अभिनेत्री गहना वशिष्ठावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ‘गंदी बात’ फेम गहनाला फेब्रुवारी महिन्यात पॉर्न चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, मात्र याप्रकरणातून गहना जामीनावर बाहेर आली.

मात्र राज कुंद्राच्या अटकेनंतर पॉर्न चित्रपट निर्मितीत गहना वशिष्ठाचे नाव पुन्हा आल्याने मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केला. या एफआयआरनंतर गहनाने अटकपूर्व जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र सत्र न्यायालयाने अभिनेत्री गहाना वशिष्ठाच्या अटकपूर्व जामीनावरील पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गहना समोरील अडचणीत अधिक वाढ झाली आहे.

- Advertisement -

गहना वशिष्ठा राज कुंद्राच्या कंपनीसोबत काम करत होती. या कंपनीच्या पॉर्न फिल्मच्या दिग्दर्शनाची जबाबदारी गहना सांभाळायची. यासह तिने अनेक पॉर्न चित्रपटांमध्येही काम केलं असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यापासून गेली ४ महिने गहना तुरुंगात होती. तेव्हापासून मुंबई पोलीस पॉर्न फिल्म रॅकेटमधील आरोपींचा शोध घेत होते. यात मुंबई पोलिसांच्या तपासात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचे नाव समोर आले. यामुळे पॉर्न फिल्म चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप रॅकेटचा भांडाफोड झाला.

- Advertisement -

गहना वशिष्ठाविरोधात यापूर्वी दोन वेळा एफआयआर दाखल झाला होता. मात्र यातून ती जामीनावर बाहेर आली. यावर तिचे वकील सुनील कुमार यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात गहना वशिष्ठाविरोधात समन्स जारी केला होता. या समन्समध्ये गहनाला पॉर्न फिल्म चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप रॅकेटप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले आहे. २७ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीच्या आधारे गहना आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्या तक्रारीत महिलेने सामूहिक बलात्काराचे आरोप केले आहेत.


 

- Advertisement -