घरक्राइमRaj Kundra Pornography Case : अभिनेत्री शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांकडून समन्स, चौकशीस...

Raj Kundra Pornography Case : अभिनेत्री शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांकडून समन्स, चौकशीस हजर राहण्याचे आदेश

Subscribe

राज कुंद्रा अश्लील फिल्म प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आला आहे. राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर गुन्हे शाखेकडून वेगाने तपास सुरू आहे. या प्रकरणात रविवारी अभिनेत्री गेहाना वसिष्ठ आणि इतर दोन जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर आज शर्लिन चोप्राची हिला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे. प्रॉपर्टी सेलमध्ये चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले आहेत. राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात शर्लिन चोप्राची चौकशी करण्यात येणार आहे. या आधीही सादर प्रकरणात शर्लिन चोप्रा हिचे नाव समोर आले होते.

शार्लिन चोप्राने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत राज कुंद्रा आणि अश्लील चित्रपटांवर आपले मत उघड केले होते. ज्यामध्ये तिने महाराष्ट्र सायबर सेलकडे या विषयावर जबाब देणारी मी पहिली अभिनेत्री असल्याचे सांगितले होते.या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्राने पुढे सांगते की ‘जेव्हा मला कोर्टाकडून समन्स बजावण्यात आला तेव्हा मी त्यांच्यासारखी गायब झाले नाही. मी शहर किंवा देश सोडण्याचा प्रयत्न केला नाही. मार्च २०२१ मध्ये मी महाराष्ट्र सायबर सेलसमोर माझा निःपक्षपाती जबाब नोंदवला. मी पत्रकार आणि मीडिया रिपोर्टरला विनंती करते की, महाराष्ट्र सायबर सेलशी संपर्क साधा आणि आपले प्रश्न त्यांच्यासमोर ठेवा आणि शक्य असल्यास माझ्या जबाबातील काही माहिती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

त्यामुळे अश्लील फिल्म प्रकरणी आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासमोरील अडचणी अधिक वाढल्या आहे. न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट तयार करत ते विविध अॅप्सद्वारे प्रदर्शित करण्याचे आरोप आहेत. या प्रकरणात आता अनेक नवे खुलासा समोर येत आहेत. नुकतंच राज कुंद्राबरोबर शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांचे कनेक्शनही उघड झाले आहे. फेब्रुवारी २०२१ शर्लिन चोप्राने राज कुंद्राने तिला या इंडस्ट्रीमध्ये कसे ढकलले याबद्दल एक विधान केले होते.

- Advertisement -

या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांची नावे आरोपी म्हणून समोर आली होती. त्यावेळी महाराष्ट्र सायबरने त्यांचा जबाब नोंदवला. या दोन्ही अभिनेत्रींनी कुंद्रावर अश्लील चित्रपट निर्मितीसंदर्भात अनेक आरोप केले होते. मात्र राज कुंद्राला गेल्या वर्षी कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला होता आणि जामीन अर्जावर अंतिम सुनावणी या महिन्याच्या शेवटी होणार होती.


जीभ पिवळी पोटात असह्य वेदना, लहान मुलांमध्ये दिसतायंत विचित्र लक्षणे


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -