मुंबई :गेल्या ११ वर्षांपासून मनसेतर्फे (MNS) दरवर्षी दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. मुंबईतील शिवाजी पार्कात या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असातत. यंदाच्या दीपोत्सवाचे काल (९ नोव्हेंबर ) उध्दाटन झाले. मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा अकरावे वर्ष आहे.
अनेक सेलिब्रिटींनी देखील मनसेच्या दीपोत्सवला हजेरी लावली होती. अभिनेता रितेश देशमुख , जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी या दीपोत्सवाला उपस्थित होते. या दीपोत्सवामध्ये रितेश देशमुख यांनी जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीमध्ये अभिनेता रितेश देशमुख यांनी प्रश्न विचारला होता की, त्याकाळी सुपरस्टार 15 लाख रूपये फि घेत होते इतकेच म्हणताच जावेद अख्तर यांनी तुम्ही इन्कम टॅक्समध्ये अडकवणार आहात का? आपला हेतू काय आहे? उघडपणे सांगा, काय पसंत करणार, CBI , ED कि Income Tax? काय हवंय आहे तुम्हाला… १५ लाख , १५ लाख काय आहे. इतके पैसे आम्ही कधी पाहिले नाही असं अख्तर म्हणाले तर सलीम खान यांनी तुमची नियत ठिक नाही वाटतं तुम्ही आतमध्ये टाकायला बसले आहात अस वाटतयं. तुम्ही गरीब लेखकांची टिंगळ करताय का असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. जावेद अख्तर यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर दीपोत्सवाला उपस्थित असणारे सर्व लोक खळखळून हसले.
“ज्या काळात सुपरस्टारला 15 लाख रूपये मिळायचे, तेव्हा सलीम आणि जावेद यांच्यासारख्या लेखकांनी २५ लाख रूपये दिले जायचं अस रितेश यांनी म्हटलं तेव्हा असं काही नाही, हे आमच्या फाईल उघडत आहेत पण तस काही होणार नाही. काश हे खरे असेत आणि आम्हाला कधी इतके पैसे मिळाले नाहीत असं अख्तर यांनी उत्तर दिले. अभिनेते त्या जमान्यात कमी पैसे घेत असतील का असं अख्तर यांनी हसत हसत सांगितले.
१० नोव्हेंबर राजी देखिल अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखक अभिजात जोशी, निर्माते साजिद नाडियादवाला, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेता विकी कौशलयांच्या हस्ते 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता उद्धाटन होणार आहे.
मनसेच्या वतीने दीपोत्साचं आयोजन केलं आहे. दिवाळीमध्ये शिवतीर्थावर तिथल्या रस्त्यांवर , झाडांवर रोषणाई करण्यात येते. हा दीपोतस्व तुळसी विवाहापर्यंत सुरू असतो. मनसेच्या दीपोत्सवात अनेक कलाकार देखील हजेरी लावत असतात. मनसे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या दीपोत्सवाला हजेरी लावतता…