घरमनोरंजनGaneshostav 2021 : 'राजा रानीची गं जोडी' मालिकेत बप्पाचं जल्लोषात आगमन

Ganeshostav 2021 : ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत बप्पाचं जल्लोषात आगमन

Subscribe

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची (Ganeshostav 2021)चाहूल सगळीकडे लागली आहे…‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी बाप्पाचे आगमन होणार आहे… सध्य स्थिति बघता विघ्नहर्त्याकडे या काळात प्रत्येक व्यक्ति हेच साकड घालत आहे की, सगळ्या चिंता दूर होवो आणि आपल्यावर ओढवलेले हे संकट बाप्पा दूर करो.   चौदा विद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती असणार्‍या आपल्या गणपती बाप्पाचे आगमन यावर्षी देखील घरोघरी उत्साहात होणार यात शंका नाही … पण, गेल्या दीड वर्षात परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं जाणवलं आहे… विघ्नहर्त्याच्या आगमनाने बर्‍याच काळापासून असलेले कोरोनाचे सावट आणि नकारात्मक वातावरण काहीसं दूर राहून सर्वत्र आनंददायी माहोल बघायला मिळेल हीच आशा आहे… कलर्स मराठीवरील सोन्याची पावलं मालिकेत गौरी – गणपतीचे आणि राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात होणार आहे.

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये ढालेपाटीलांच्या घरामध्ये बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे… रणजीत घरच्या बाप्पाची स्थापना करणार आहे. घरच्यांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. ढालेपाटीलांच्या घरात थाटामाटात आगमन तर होणार आहे पण या प्रसंगी सगळ्यांना संजूची कमतरता नक्कीच भासणार आहे. संजूवर आता घराची आणि कामाची अशी दुहेरी जबादारी आहे, जी ती उत्तमरीत्या पार पाडत आहे. यावेळेसचा गणेशोत्सव संजूसाठी थोडा वेगळा असणार आहे. कारण ती बाप्पाची आरती ऑनलाइन करणार आहे.

- Advertisement -


सोन्याची पावलं मालिकेमध्ये गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. पण, भाग्यश्री – दुष्यंतवर खूप मोठं संकट ओढवणार आहे. ही बातमी घरात कळताच एकीकडे उमा देवाला साकड घालणार आहे. तर दुसरीकडे, भाग्यश्रीला देवीआई दर्शन देणार आहे. त्या संकटावर ते दोघे कशी मात करणार. पुढे काय होणार ? हे बघा १२ सप्टेंबरच्या एका तासाच्या विशेष भागामध्ये संध्या ७.०० वा.


हे हि वाचा – KBC13- गणेशोत्सवाच्या निमित्ताने पवनदीप राजनची बिग बींसोबत खास संगीत मैफील

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -