घरमनोरंजनराजामौलींचा 'छत्रपती' आता हिंदी रिमेकमध्ये; 'हा' साऊथ अभिनेता साकारणार भूमिका

राजामौलींचा ‘छत्रपती’ आता हिंदी रिमेकमध्ये; ‘हा’ साऊथ अभिनेता साकारणार भूमिका

Subscribe

भारतात इतर चित्रपटांच्या तुलनेत साऊथच्या चित्रपटांचे अनेक चाहते आहेत. या चित्रपटांची कथा प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करते. चाहते नेहमीच या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे सध्या अनेक बॉलिवूड कलाकरही टॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना दिसत आहेत. तसेच आता काही टॉलिवूड कलाकारही बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. तेलुगू अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवास देखील आता लवकरच बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.

‘छत्रपती’ चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

बेल्लमकोंडा साई श्रीनिवास याबाबत त्याच्या ट्वीटरवरुन माहिती दिली असून यासोबत त्याने चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील शेअर केला आहे. यात त्याने लिहिलंय की, “प्रतीक्षा संपली आहे, छत्रपती 12 मे 2023 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल. असं म्हटलं आहे.

- Advertisement -

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटाची कथा विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली असून ती शिवाजी नावाच्या व्यक्तीभोवती फिरते, जो लहानाचा मोठा झालेल्या गावातील लोकांचा आधार बनतो. हिंदी रीमेकमध्ये बेल्लमकोंडा श्रीनिवास यांची भूमिका आहे. यात अभिनेत्री नुसरत भरुचा चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. शिवाय चित्रपटात साहिल वैद, अमित नायर, शिवम पाटील आणि राजेंद्र गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

प्रभासचा ‘छत्रपती’ 2005 मध्ये झाला होता प्रदर्शित

राजामौली यांचा प्रभास स्टारर चित्रपट छत्रपती हा 2005 मध्ये आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. राजामौली यांचा हा चौथा चित्रपट होता. त्याची कथा त्यांचे वडील केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. या चित्रपटात प्रभाससोबत श्रिया सरन, भानुप्रिया, प्रदीप रावत लोड रोलमध्ये होते. दरम्यान, आता त्याचा हिंदी रिमेक 12 मे 2023 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल.

- Advertisement -

हेही वाचा :

शोमध्ये माधुरी दीक्षितवर आक्षेपार्ह टिप्पणी; नेटफ्लिक्सला पाठवण्यात आली कायदेशीर नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -