Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी राजेश खन्ना यांनीच टि्ंवकलला पाजली स्कॉच, द्यायचे डेटींग टिप्स

राजेश खन्ना यांनीच टि्ंवकलला पाजली स्कॉच, द्यायचे डेटींग टिप्स

आपली हीच लाईफस्टाईल मुलींनीही अंगिकारावी असे त्यांना वाटायचे.याबदद्ल त्यांची मुलगी व अभिनेत्री टि्ंवकल खन्ना हीने एक किस्सा सांगितला होता.

Related Story

- Advertisement -

एकेकाळी बॉलीवूडवर राज्य करणारे सुपरस्टार राजेश खन्ना जितके त्यांच्या चित्रपटांबदद्ल चर्चेत असायचे तितकेच ते त्यांच्या हटके लाईफस्टाईलसाठीही ओळखले जायचे. खाण्यापिण्याची तर त्यांना आवड होतीच पण उंची राहणीमान, नीटनेटकेपणा आणि महागड्या वस्तूंचेही त्यांना क्रेज होते.

आपली हीच लाईफस्टाईल मुलींनीही अंगिकारावी असे त्यांना वाटायचे.याबदद्ल त्यांची मुलगी व अभिनेत्री टि्ंवकल खन्ना हीने एक किस्सा सांगितला होता. आयुष्यात पहील्यांदाच ड्रिंक घेतलं होतं. ते ही आपल्याला वडिलांनीच त्यांच्या हाताने पाजल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होते.

- Advertisement -

एवढचं नाही तर आपले वडील आपल्याला डेटींगसाठी टिप्सही द्यायचे. त्यात एक नाही तर चार पाच बॉयफ्रेंड कर. म्हणजे तुझ्यावर कधी रडण्याची वेळ येणार नाही. असा गंमतीदार सल्ला ते द्यायचे. असेही तिने सांगितले होते. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर टि्ंवकल व रिंकी राजेश खन्ना यांच्यापासून दुरावल्या होत्या. राजेश खन्ना यांचे मुलींवर जीवापाड प्रेम होते.
ते नेहमी मुलींच्या संपर्कात असायचे. दोघींनी चित्रपटात करीयर करावे अशी राजेश खन्ना यांची इच्छा होती. पण टि्ंवकल व रिंकी यांना चित्रपटात यश मिळाले नाही. त्यानंतर टि्ंवकलने अभिनेता अक्षय कुमार याच्याबरोबर तर रिंकीने एका बिझनेसमनबरोबर लग्न करून चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम केला.

- Advertisement -