ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘राजी-नामा’ चीच चर्चा

अभिजित पानसे यांचं दिग्दर्शन असलेली 'राजी - नामा' ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिजित पानसे आणि चिन्मय मांडलेकर ही जोडी सुद्धा या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात(maharashtra politics) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. अनपेक्षित वळणं सुद्धा गेल्या काही दिवसात राजकारणात आली. राज्यातील राजकारणाच्या याच पार्श्वभूमीवर ‘राजी – नामा’ ही नवीन वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सिरीजचं दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे.

दरम्यान या आधी अभिजित पानसे(abhijit panse) यांची ‘रानबाजार'(ranbazar) ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेब सिरीजने संपूर्ण वेब विश्व हादरवून सोडले होते. या वेब सीरिजला सुद्धा प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. ‘रानबाजार’ या वेब सिरीजचे सर्वच भाग सुपरहिट ठरले होते.

 

आणखी वाचा – उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना दिलासा, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला

अभिनय आणि लेखन क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणारा कलाकार चिन्मय मांडलेकर आणि दिग्दर्शक अभिजित पानसे(abhijit panse) ही एक परिपूर्ण जोडी ‘राजी – नामा'(rajinaama) च्या निमित्ताने एकत्र येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळी पर्वणी मिळणार आहे. ‘राजी – नामा’ (rajinaama) या वेब सिरीजची कथा प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित आहे. त्याच सोबत ‘राजी-नामा’ या वेब सिरीजची संकल्पना चिन्मय मांडलेकर याची असून या वेब सीरिजचे लेखन सुद्धा चिन्मय मांडलेकर यानेच केले आहे. त्यामुळे आता या वेब सीरिजच्या निमित्ताने प्रेक्षकांना आता राजकारणातील खळबळ पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – सफलतेची एक प्रेरणादायी गोष्ट… कंगना रनौतने एकनाथ शिंदेंना दिल्या खास शुभेच्छा

‘राजी-नामा’ या वेब सिरीजची घोषणा शुक्रवार १ जुलै रोजी करण्यात आली. आणि त्याच संदर्भातील आणखी उत्सुकता वाढविणारा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. स्वतः चिन्मय मांडलेकर याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. एकीकडे अभिजित पानसे(abhijit panse) यांच्या वेब सिरीज हिट ठरत आहेत तर दुसरीकडे चिन्मय मांडलेकर सुद्धा अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. ‘शिवराज अष्टक’ मधील चिन्मय मांडलेकर(chinmay mandlekar) याचे आतापर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप हिट ठरले आहेत. त्यामुळे चिन्मय मांडलेकर आणि अभिजित पानसे यांची ही जोडी आता काय नवीन कामाल करणार आहे याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहीलं आहे.

 

आणखी वाचा – तुम्ही राजीनामा द्या आणि.., केसरकरांचं संजय राऊतांना आव्हान

 

आणखी वाचा –  मृण्मयी आणि गौतमीचा नवा फिटनेस फंडा, व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

 

अभिजित पानसे यांनी ‘रानबाजार’ या वेब सिरीजमधून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आणि मराठी वेब विश्वात एक अनोखा आणि वेगळा प्रयोग केला आणि तो यशस्वीसुद्धा झाला. त्यांचे चित्रपटसुद्धा नेहमीच हटके असतात. ‘रानबाजार’ च्या यशानंतर अभिजित पानसे ‘राजी- नामा’ ही वेब सिरीज घेऊन आले आहेत. या मध्ये खुर्ची मिळविण्यासाठी सुरु असलेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या ‘राजी-नामा’ मध्ये काय खळबळ पाहायला मिळणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. तूर्तास ‘राजी – नामा’ मधून एक दमदार कथानक घेऊन अभिजित पानसे सज्ज झाले आहेत. या वेब सिरीजची सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. त्यामुळे यामध्ये नेमके कोणते राजकीय चित्रं पाहायला मिळते याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहीलं आहे.