HBD Superstar Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवशी क्रिकेटर हरभजनच्या टॅटूने वेधलं सर्वांचं लक्ष

हरभजनने रजनीकांत यांचा हुबेहुब टॅट आपल्या छातीवर कोरला

Rajinikanth Birthday Cricketer Harbhajan Singh Rajinikanth tattoo on his chest
Rajinikanth Birthday: सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवशी क्रिकेटर हरभजनच्या टॅटूने वेधलं सर्वांचं लक्ष

साउथ सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा ७१वा वाढदिवस साजरा करत आहेत. केवळ दक्षिण भारतातच नाही तर त्यांनी संपूर्ण जगभरात आपल्या अभिनयाची छाप सोडली. जगभरातून रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. ट्विटरवर देखील #HBDSuperstarRajinikanth असे ट्रेंड होत आहे. दरवर्षी रजनीकांत यांच्या वाढदिवसाला दक्षिण भारतात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. अनेक जण अनोख्या पद्धतीन त्यांना शुभेच्छा देत असतात. आज मात्र क्रिकेटर हरभजन सिंह याच्या अनोख्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधलं आहे. हरभजनने रजनीकांत यांचा हुबेहुब टॅट आपल्या छातीवर कोरला आहे. छातीवरील टॅटूचा फोटो शेअर हरभजनने रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

‘८० आणि ९०च्या दशकात तुमचेचं नाणे चालायचे. सिनेसृष्टीतील एकमेव सुपरस्टार लीडर रजनीकांत यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा’, असं म्हणत हरभजनने फोटो शेअर केले आहे. मात्र हरभजनने काढलेला टॅट हा परमनंट आहे की टेम्पररी हे काही समजू शकलेलं नाही.

सुपरस्टार रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली. त्याचवेळी त्यांचा दादसाहेब फाळके पुरस्काराने देखील सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली. आता मात्र रजनीकांत यांची प्रकृती उत्तम आहे.

सोशल मीडियावर शेअर केल्या क्रिएटिव्ह पोस्ट

 


रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांच्या अनेक क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आलीत. अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका फॅनने झाडाच्या पानावर रजनीकांत यांचे चित्र साकारले आहे. रजनीकांत यांच्या अभिनयाची जादू कायम प्रेक्षकांवर पहायला मिळते. रजनीकांत आजही अनेकांसाठी गुरू, आदर्श, आयुष्यात प्रेरणा देणारे व्यक्ती आहेत.


हेही वाचा – Ankita – vicky jain Wedding: लगीन घटीका समीप आली! अंकिताच्या हातावर सजली विक्कीच्या नावाची मेहंदी