घरताज्या घडामोडीऐश्वर्या रजनीकांत लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

ऐश्वर्या रजनीकांत लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Subscribe

ऐश्वर्या रजनीकांतने साऊथ सिनेसृष्टीत डिरेक्टर आणि सिंगर म्हणून चांगले काम करुन प्रसिद्धी मिळवली आहे. साऊथमध्ये आपल्या कामातून प्रेक्षकांवर भुरळ घातल्यानंतर ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या आता पुन्हा एकदा चर्चेत आली असून ही चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याची नसून तिच्या प्रोफेशनल लाईफ विषयी आहे. ऐश्वर्या रजनीकांत लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूडच्या पदार्पणाची जय्यत तयारी देखील सुरू केली आहे.

ऐश्वर्या रजनीकांतने साऊथ सिनेसृष्टीत डिरेक्टर आणि सिंगर म्हणून चांगले काम करुन प्रसिद्धी मिळवली आहे. साऊथमध्ये आपल्या कामातून प्रेक्षकांवर भुरळ घातल्यानंतर ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. ऐश्वर्या ओ साथी चल या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. डिरेक्टर म्हणून ऐश्वर्याचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा असणार आहे. मीनू अरोराने सिनेमाचे निर्मिती केली आहे. ऐश्वर्याचा पहिला हिंदी डिरेक्ट सिनेमा एका सच्च्या लव्ह स्टोरीवर आधरित आहे.

- Advertisement -

ओ साथी चल या सिनेमाच्या स्क्रिप्टींगचे काम सध्या सुरू आहे. तसेच सिनेमाची कास्ट देखील फायनल करण्यात येत आहे. ऐश्वर्या रजनीकांत काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. उपचारानंतर पुन्हा एकदा ऐश्वर्याने तिच्या कामाला सुरुवात केली आहे.

ऐश्वर्या धनुष यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. दोघांच्या वेगळं होण्याचे कारण त्यांनी सांगितले नाही परंतु आमच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा असे आवाहन करत एक पोस्ट शेअर केली होती. दोघेही लग्नाच्या बंधनातून वेगळे झाले असले तरी मुलांचे संगोपन ते एकत्र करणार आहेत. घटस्फोटानंतर धनुष आणि ऐश्वर्या आपापल्या कामाला लागले असून धनुष त्याच्या नव्या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त असून ऐश्वर्या देखील आता बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – The Kashmir Files Day 9 Collection : 9व्या दिवशी ‘द काश्मीर फाईल्स’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -