दाक्षिणात्य सिनेविश्वाचे मेगास्टार अर्थात अभिनेता रजनीकांत यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. टॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत त्यांची कायम चर्चा असते. ज्यामुळे रजनीकांत कोण आहेत? हे वेगळे सांगायची गरज नाही. साऊथच्या अनेक भागांमध्ये रजनीकांत यांची देवासारखी पूजा केली जाते. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आज रजनीकांत यांचे नाव नामांकित अभिनेत्यांमध्ये आहे. असे असूनही सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘रजनीकांत चांगला अभिनेता नाही’ असे वक्तव्य केले आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया. (Rajinikanth is not good actor said by ram gopal varma)
काय म्हणाला राम गोपाल वर्मा?
बॉलिवूड सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्माने ‘रजनीकांत एक चांगला अभिनेता नाही’, असे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना त्याने स्पष्ट सांगितले, ‘मी रजनीकांतला चांगला अभिनेता मानत नाही. त्याचे बिना स्लो मोशन काहीही अस्तित्व नाही. रजनीकांतपेक्षा मनोज बाजपेयी अधिक चांगला अभिनेता आहे’, असेही वर्माने म्हटले.
रजनीकांत यांच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह
अलीकडेच एका मुलाखतीत राम गोपाल वर्माने अभिनेता आणि स्टार यातील अंतर सांगितले. ज्याविषयी बोलताना त्याने म्हटले, ‘अभिनयाचा अर्थ एखादे पात्र रंगवणे असा होतो. स्टारचा अर्थ केवळ परफॉर्मन्सपुरता मर्यादित असणे असा होतो. त्यामुळे या दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. रजनीकांत एक चांगला अभिनेता आहे का? मला नाही माहित. कारण मला वाटत नाही रजनीकांत भिकु म्हात्रेसारखी (सत्या सिनेमातील मनोज बाजपेयीचे पात्र) भूमिका करू शकेल. स्लोमोशनशिवाय रजनीकांतचा अस्तित्व काय आहे? मला नाही वाटत याशिवाय त्याचे काही अस्तित्व असू शकते’.
पुढे बोलताना राम गोपाल वर्माने म्हटले, ‘रजनीकांत आणि अमिताभ बच्चनसारख्या कलाकारांना लोक देवासारखे पूजतात. अशावेळी लोकांना त्या त्या कलाकाराला वेगळ्या भूमिकेत पहायला आवडत नाही. जेव्हा एखादा स्टार नॉर्मल कॅरेक्टर साकारतो तेव्हा लोकांकडून निराशा व्यक्त केली जाते. उदाहरणार्थ, अमिताभ बच्चनला तो सीन अजिबात आवडला नव्हता. ज्यात त्यांच्या पोटात प्रचंड वेदना होत असल्याचे दर्शवले होते’. तसेच राम गोपाल वर्माने असेही म्हटले की, ‘तुम्ही स्टार्सला देवाच्या रूपात पाहता. पण देव कधीच एखादी भूमिका साकारू शकत नाही’.
राम गोपाल वर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आगामी काळात त्याचा ‘सिंडीकेट’ हा सिनेमा येणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, फहाद फासिल आणि वेंकटेश मुख्य भूमिकेत असतील, असे बोलले जात आहे.
हेही पहा –
Paaru Serial : पारू मालिकेला 1 वर्ष पूर्ण, कलाकारांनी केलं जंगी सेलिब्रेशन