रजनीकांत यांना ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चे शूटिंग पडले महागात

रजनीकांत यांना काही कार्यकर्त्यांनी अटक करण्याची मागणी केली आहे.

rajinikanth shoots man vs wild episode with bear grylls activists demand his arrest
रजनीकांत यांना ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चे शूटिंग पडले महागात

साउथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत हे ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ च्या शूटिंगमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. कर्नाटकातील बंदिपूर राष्ट्रीय उद्यानात रजनीकांत यांचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या शोमधील एपिसोडचं शूट नुकतच पार पडलं. मात्र या शूटिंग दरम्यान त्यांना दुखापत झाल्याचे समोर आले होते. पण नंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत प्रसारमाध्यमांना सांगितले की, काट्याकुट्यांमुळे मला खरचटले, अन्य फार दुखापत नाही. मात्र या शोच्या शूटिंगमुळे रजनीकांत हे एका अडचणीत अडकलेले दिसत आहेत. काही कार्यकर्त्यांनी रजनीकांत यांना अटक करण्याची मागणी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तनुसार, रजनीकांत यांनी बेअर ग्रिल्ससोबत कर्नाटकमधील बांदिपूर येथील जंगलात शूटिंग केले. त्या जंगलातील प्राण्यांच्या काळजीपोटी या कार्यकर्त्यांनी रंजनीकांत यांच्या विरोधात आंदोलन केले.

रजनीकांत आणि बेअर ग्रिल्सच्या ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ च्या शूटिंगबाबत चिंता व्यक्त करत कार्यकर्त्यांनी सांगितले की, शूटिंगसाठी जे क्रू टायगर रिझर्व्ह पार्कमध्ये आहेत त्यामुळे प्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय कोरड्या हवेमुळे जंगलात आग पण लागू शकते. ही आग विझवणे फार कठीण होऊ शकते. तसेच एका कार्यकर्त्याचे म्हणणे आहे की, ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चे शूटिंग हे पावसाळ्यात झाले असते.

या शूटिंगनंतर साउथ सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी बेअर ग्रिल्सचे आभार मानले आहेत. रजनीकांत यांनी ट्विटमध्ये असं लिहिलं, ‘एक अद्भुत आणि कधीही न विसणाऱ्या अनुभवाबद्दल बेअर ग्रिल्स धन्यवाद.’ या अगोदर बेअर ग्रिल्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ हा शो केला होता. १२ ऑगस्टला हा शो प्रदर्शित झाला होता. शो दरम्यान, जेव्हा बेअर ग्रिल्सने पंतप्रधान मोदींची भाला दिला तेव्हा ते म्हणाले की, माझे संस्कार कोणाचीही हिंसा करणे सांगत नाहीत.


हेही वाचा – कार्तिक साराला म्हणतोय ‘हा मै गलत’