Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन राजकुमार राव आणि जान्हवीचा ‘रुही’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला

राजकुमार राव आणि जान्हवीचा ‘रुही’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला

11 मार्चला ‘रुही’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'स्त्री' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाल घातल्यानंतर आता अनेक प्रेक्षक 'रूही' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्त्री सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमात राजकुमार आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरने प्रक्षेकांचे भरपूर मनोरंजन केले. यातच आता राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा रुही हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतंच जान्हवीने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर या सिनेमाचे टीजर प्रदर्शित केले. याआधी या सिनेमाला ‘रुही-आफजा’ असं नाव देण्यात आले होते. मात्र यात बदल करत आता ‘रुही’ असं ठेवण्यात आले. 11 मार्चला ‘रुही’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘स्त्री’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाल घातल्यानंतर आता अनेक प्रेक्षक ‘रूही’ या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 16 फेब्रुवारीला ‘रुही’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

- Advertisement -

“भूतिया शादी में आपका स्वागत है” असं कॅप्शन देत ‘रुही’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. राजकुमार रावचा हा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. कॉमेडीचा तडका असलेल्या रुही’ या सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसह वरुण शर्मा झळकणार आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांची महत्वाची भूमिका आहे. हार्दिक मेहता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.


हेही वाचा- नेपोटीझमच्या वाद अडलेला करण जोहर लाँच करतोयं ४ नवे चेहरे

 

- Advertisement -