घरमनोरंजनयंदा कर्तव्य आहे! राजकुमार राव लवकरच चढणार बोहल्यावर

यंदा कर्तव्य आहे! राजकुमार राव लवकरच चढणार बोहल्यावर

Subscribe

बॉलिवूडमध्ये (Bollywood)आता लग्नाचे वारे वाहत आहे. गेल्या काही काळापासून बॉलिवूडचे क्यूट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir Kapoor & Alia Bhatt)लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगत आहे तर दुसरीकडे विक्की कौशल आणि कॅटरीना कैफ देखील लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान, आता बॉलिवूडमधील आणखी एक जोडी लवकरच चाहत्यांना एक गुड न्यूड देणार आहे.(Rajkummar rao marrying patralekhaa on november date fixed) आपल्या दमदार अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारा अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao)काही महिन्यातच अभिनेत्री पत्रलेखा(patralekhaa) सोबत सात फेरे घेणार असल्याचं बोललं जात आहे. पुढील महिन्यात दोघांचा विवाह सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती ई-टाईम्स या वेबसाईटने दिली आहे.

पत्रलेखा आणि राजकुमार राव गेल्या अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सिटी लाईट्स या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. माहितीनुसार दोघांनी त्यांच्या लग्नाचा मुहूर्त निश्चित केला असून पुढच्या महिन्यात दोघेही लग्न उरकणार आहेत.

- Advertisement -

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सावधानता बाळगत  काही लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडणार असल्याचे कळतेय. तसेच या समारंभात कुटुंबातील जवळील सदस्य आणि मित्रपरिवार सहभागी होणार असून सिनेसृष्टीतील काही मित्रांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. 10,11 आणि 12 नोव्हेंबरला लग्नाची तारिख निश्चित करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र दोघांनीही अद्याप अधीकृतपणे यावर भाष्य करणे टाळलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

- Advertisement -

पत्रलेखा आणि राजकुमार बद्दल सांगायचे झाल्यास ‘सिटी लाईट्स’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची पहिली भेट झाली. या सिनेमात दोघांच्याही मुख्य भूमिका होत्या. गेल्या 10 वर्षापासून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. तसेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडणारा अभिनेता राजकुमार कधी लग्नबंधनात अडकणार  याची उत्सुकता चाहत्यांना देखील लागून राहीली आहे.


हे हि वाचा –  ‘माझी महाराष्ट्रीयन गर्लफ्रेंड होती तिने मला…’ अक्षय कुमारने थुकरटवाडीत सांगितलं सिक्रेट

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -