बधाई दो साठी Rajkumar Raoचं अफलातून बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

सिनेमा, कथा आणि त्यासोबत राजकुमार रावच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची देखील तितकीच चर्चा होत आहे. राजकुमारने त्याच्या सोशल मीडियावर बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे अफलातून फोटो शेअर केले आहेत.

rajkummar rao shared photos of body transformation for badhaai do
बधाई दो साठी Rajkumar Raoचं अफलातून बॉडी ट्रान्सफॉरमेशन

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा बधाई दो हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राजकुमार राव यावेळी समलैंगिक विवाहावर भाष्य करताना दिसतोय. आपल्या तगड्या अभिनयाने राजकुमार राव सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सिनेमा प्रेक्षकांना आवडलाय कारण सिनेमासाठी दोन्ही कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. राजकुमार रावचा नवा अवतार प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळाला. सिनेमा, कथा आणि त्यासोबत राजकुमार रावच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची देखील तितकीच चर्चा होत आहे. राजकुमारने त्याच्या सोशल मीडियावर बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे अफलातून फोटो शेअर केले आहेत.

‘जगात सगळ्यात सुंदर भावना त्या असतात तेव्हा तुम्ही एका सिनेमासाठी आणि त्यातील पात्रासाठी तुमच्या ह्रदयापासून आणि आत्म्यापासून मेहनत करता.  प्रेक्षक देखील त्याला तितकेच प्रेम देतात. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद’, असे म्हणत राजकुमार रावने त्याचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर केला आहे. ज्यात एक फोटो ट्रेनिंगच्या दिवसातील आहे आणि दुसरा फोटो बॉडीट्रान्सफॉर्मेशन नंतरचा ऑन सेटवरील आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनी राजकुमारचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

राजकुमारचे चाहते तर त्याचे कौतुक करतच आहे. मात्र अभिनेत्री भूमी पेडणेकरने देखील राजकुमारचे कौतुक केले आहे. त्याचा संपूर्ण प्रवास तिने पाहिला असल्याने, तिने कमेंटमध्ये म्हटलेय, ‘वाह ! तु स्किम्ड मिल्क पनीर, ब्रोकोली खात होतास. मी कधीच विसरू शकत नाही. तुझे जेवण पाहून मला माझे जेवण डायजेस्ट होत नव्हते. तु अविश्वसनीय आहेत’.

बधाई दो नंतर राजकुमार रावचे बॅक टू बॅक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोनिका, ओह माय डार्लिंग, गन्स एंड गुलाब्स सारख्या आगामी सिनेमात राजकुमार राव दिसणार आहे.


हेही वाचा – Gangubai Kathiyawadiतील आलियाची नक्कल करणाऱ्या चिमुकलीला नेटकऱ्यांची पसंती ; कंगना मात्र भडकली