घरमनोरंजनVideo: सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'दरबार'चा ट्रेलर प्रदर्शित

Video: सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘दरबार’चा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

सुपरस्टार रजनीकांतच्या दरबार चा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. ट्रेलर रिलीज होताच क्षणी ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळत आहे. सध्या रजनीकांत दरबार या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नेहमीप्रमाणेच रजनीकांत दरबार या चित्रपटात वेगळ्या आणि हटक्या भुमिकेत दिसणार आहे. रजनीकांत यांच्या या लूकची सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये चर्चा आहे. या चित्रपटात ते पोलिसाच्या भुमिकेत दिसणार आहेत. प्रत्येक चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही या चित्रपटात रजनीकांत यांची धमाकेदार एन्ट्री आणि सूपर लूक असणार यात शंकाच नाही.

View this post on Instagram

Vanakkam! Vandhuten nu sollu!

A post shared by Rajinikanth (@rajinikanth) on

- Advertisement -

या चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर नयनतारा,प्रतीक बब्बर, आणि सुनील शेट्टी एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी,तमीळ,तेलगु आणि मल्ल्याळम या चार भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. दरबार चित्रपटाच ए.आर.मुरूगदास दिग्दर्शन करत आहेत.

- Advertisement -

या चित्रपटानंतर तब्बल २७ वर्षानंतर रजनीकांत पोलिसाच्या भुमिकेत दिसणार आहेत. रजनीकांत यांचा १६९ वा हा चित्रपट आहे. तरी त्यांच्या या लूकची चर्चा आहे. ९ जानेवारी २०२० ला चाहत्यांच्या प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -