बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव नेहमीच कोणत्या ना कोणत्यातरी कारणांमुळे वादांमध्ये अडकतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा राजपाल नव्या अडचणीत सापडला आहे. खरंतर, राजपालच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना शूटिंगदरम्यान त्याने एका विद्यार्थ्याला धडक मारली. ही घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे घडली असून आता राजपाल विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपघात झालेल्या विद्यार्थ्याचे नाव बालाजी असून त्याने तक्रार केली की, तो विश्वविद्यालय बँक रोडजवळ पुस्तकं खरेदी करत होता. तिथे कोणत्यातरी चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. ज्यात राजपाल स्कूटर चालवण्याचा सीन करत होता.
विद्यार्थ्याने राजपाल यादववर आरोप करत सांगितलं की, शूटिंग दरम्यान राजपाल यादव स्कूटर योग्य पद्धतीने चालवत नव्हता. ज्यामुळे तो स्कूटर बॅलन्स करु शकला नाही आणि त्याने माझ्या बाईकला घडक दिली. शिवाय त्यानंतर जेव्हा त्याने जाब विचारायला सुरुवात केली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सेटवरील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यासोबत गैरव्यवहार करत त्याला मारहाण केली. शिवाय त्याला जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.
शूटिंग सेटवरील यूनिटने देखील विद्यार्थ्याविरोधात तक्रार
या प्रकरणात राजपालच्या शूटिंग सेटवरील यूनिटने देखील विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली. या सेटवरील कर्मचाऱ्यांच्या मते, हा विद्यार्थी शूटिंगमध्ये अडथळा आणत होता. शिवाय त्याच्या फोनमध्ये शूटिंगचा व्हिडीओ देखील करत होता.
हेही वाचा :