घरमनोरंजनराजू श्रीवास्तव अजूनही बेशुद्ध, प्रकृती चिंताजनक

राजू श्रीवास्तव अजूनही बेशुद्ध, प्रकृती चिंताजनक

Subscribe

AIIMS कडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटक्या आला त्यावेळी त्यांच्या डोक्याला देखील दुखापत झाली होती. ते आता व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती खूप नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंनटिलेटर वर ठेवण्यात आले आहे. १० ऑगस्ट रोजी त्यांना वर्कआउट करताना हृदय विकाराचा झटका आला होता, त्यानंतर तात्काळ त्यांना दिल्ली येथील एका हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, असूनही त्यांची प्रकृती सुधारली नसून त्यांना अजून शुद्ध आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर
AIIMS कडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटक्या आला त्यावेळी त्यांच्या डोक्याला देखील दुखापत झाली होती. ते आता व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती खूप नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने सांगितले की, ते आता गंभीर परिस्थिचतीमध्ये आहेत. डॉक्टर त्यांच्यावर ICU मध्ये उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती असूनही आहे तशी आहे. हॉस्पिटलची संपूर्ण मेडिकल टीम त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. आम्ही फक्त देवाकडे प्रार्थना करत आहोत आणि आम्हाला आशा आहे की, ते लवकरात लवकर ठिक होतील. यावेळी माझी आई त्यांच्यासोबत ICU मध्येच आहे.

- Advertisement -

वर्कआउट करताना आला हृदयविकाराचा झटका
१० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जीममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर एक्सरसाईज करत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि ते खाली पडले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना तत्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. राजू श्रीवास्तव पक्षातील काही मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे आले होते. सकाळी ते जीम करण्यासाठी हॉटेलच्या जीममध्ये गेले. त्यावेळी वर्कआउट करता करता त्यांना हृदय विकाराचा झटका आला.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ कार्यक्रमाने मिळाली ओळख

- Advertisement -

राजू श्रीवास्तव यांना कॉमेडीचा बादशाह म्हटलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ या कार्यक्रमाने राजू श्रीवास्तव यांना ओळख दिली.


हेही वाचा :कॉमेडियन राजू श्रीवास्तव AIIMSमध्ये व्हेंटिलेटरवर; प्रकृती नाजूक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -