घरमनोरंजनराजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा; मुलीने दिली माहिती

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा; मुलीने दिली माहिती

Subscribe

राजू श्रीवास्तव गेल्या हे हळूहळू बरे होऊ लागले आहेत. डॉक्टरांच्या मते, राजू आता हळूहळू रिकव्हर होत आहेत, परंतु त्यांची प्रकृती ठिक होण्यासाठी काही वेळ जाईल. डॉक्टर त्यांनी बरं करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत.

सुप्रसिद्ध कॉमेडीयन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदय विकारच्या झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दिल्लीमधील एका हॉस्पिटलमध्ये राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, 12 ते 13 दिवस होऊनही राजू श्रीवास्तव यांना अजूनही शुद्ध आलेली नाही. तसेच ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत.

परंतु मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव गेल्या हे हळूहळू बरे होऊ लागले आहेत. डॉक्टरांच्या मते, राजू आता हळूहळू रिकव्हर होत आहेत, परंतु त्यांची प्रकृती ठिक होण्यासाठी काही वेळ जाईल. डॉक्टर त्यांनी बरं करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

राजूंच्या मुलीने दिली प्रकृतीची माहिती
राजूंची मुलगी अंतरा ने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांना सुद्धा त्यांच्या प्रकृती सुधारण्याची प्रतीक्षा आहे आणि आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत असतो.

राजू श्रीवास्तव यांची तब्येत कधी आणि कशी बिघडली?
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचा घेत आहेत. सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांचे निरीक्षण करत आहे.


हेही वाचा :राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत शेखर सुमनने दिली माहिती; ट्वीट शेअर करत म्हणाला महादेवाची कृपा…

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -