राकेश झुनझुनवाला यांचं बॉलिवूडमधील ‘या’ 3 चित्रपटांशी कनेक्शन

राकेश झुनझुनवाला यांची ओळख शेअर मार्केटमुळे आहे. त्यांनी 5 हजार रूपयांपासून 40 हजार कोटी रूपयांची संपत्ती शेअर मार्केटच्या जोरावर उभी केली. शेअर मार्केट व्यतिरिक्त त्यांचे बॉलिवूड कनेक्शन देखील होते. मात्र हे फार कमी लोकांना ठाऊक होते.

शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांनी ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली.

राकेश झुनझुनवाला यांची ओळख शेअर मार्केटमुळे आहे. त्यांनी 5 हजार रूपयांपासून 40 हजार कोटी रूपयांची संपत्ती शेअर मार्केटच्या जोरावर उभी केली. शेअर मार्केट व्यतिरिक्त त्यांचे बॉलिवूड कनेक्शन देखील होते. मात्र हे फार कमी लोकांना ठाऊक होते. खरंतर, राकेश झुनझुनवाला यांनी 1999 साली मुंबईमध्ये डिजिटल एंटरटेनमेंट कंपनी हंगामा डिजिटल मीडिया बनवली होती. या कंपनीचे नाव नंतर हंगामा डिजिटल एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड झाले. राकेश झुनझुनवाला यांनी केवळ कंपनीचं नाही तर बॉलिवूडमधील 3 चित्रपटांची निर्मिती केली होती. या चित्रपटांमध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार दिसून आले होते.

श्रीदेवी आणि अमिताभच्या चित्रपटांची निर्मिती
2012 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी श्रीदेवीच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच 2015 मध्ये त्यांनी अमिताभच्या ‘शमिताभ’ चित्रपचटाची देखील निर्मिती केली होती. या चित्रपटामध्ये अमिताभ आणि धनुष यांनी मुख्य भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त 2016 मध्ये करीना कपूर आणि अर्जुन कपूरच्या ‘की अॅण्ड का’ या चित्रपटाची देखील निर्मिती केली होती. या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.


हेही वाचा :‘रक्षाबंधन’च्या प्रमोशनदरम्यान पुण्यामध्ये अक्षयने घेतला पुणेरी मिसळीचा आस्वाद; पोस्ट शेअर करत केलं कौतुक