Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'मला टिश्यू पेपर प्रमाणे वापरलं...' शोमधून आऊट केल्याने राखीचा Bigg boss वर...

‘मला टिश्यू पेपर प्रमाणे वापरलं…’ शोमधून आऊट केल्याने राखीचा Bigg boss वर आरोप

Subscribe

तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही मला बोलावून घ्याल आणि टिश्यू पेपरसारखा माझा वापर कराल आणि नंतर मला फेकून द्याल. मी टिश्यू पेपर नाही. बिग बॉसने माझा टिश्यू पेपर प्रमाणे वापर केला असा आरोप राखीने केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant)  बिग बॉस 15 (Bigg boss15) च्या घरात हैदोस घालत होती. राखीमुळे शोचा टीआरपी चांगलाच वाढला होता. प्रेक्षकांचे राखीने प्रचंड मनोरंजन केले. तिला जिंकायचा होता मात्र राखीला बिग बॉस 15 मधून बाहेर काढण्यात आले. घराबाहेर पडल्यानंतर राखीने बिग बॉसच्या नावाने चांगलाच हंगामा केला असून बिग बॉसने माझा टिश्यू पेपर प्रमाणे वापर केला आणि नंतर फेकून दिले, असा आरोप केला आहे. राखीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

राखी सावंत पापराझींच्या कॅमेरासमोर अनेकदा अनेक गोष्टी बरळली आहे. मात्र यावेळी राखीने थेट बिग बॉसवर निशाणा साधत चांगेलच आरोप केले आहेत. विरल भयानीने राखीचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात राखी म्हणतेय, मी टिश्यू पेपर आहे का? तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही मला बोलावून घ्याल आणि टिश्यू पेपरसारखा माझा वापर कराल आणि नंतर मला फेकून द्याल. मी टिश्यू पेपर नाही. बिग बॉसने माझा टिश्यू पेपर प्रमाणे वापर केला असा आरोप राखीने केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

त्याचप्रमाणे पुढे राखी म्हणाली, बिग बॉस म्हणजे, जो पर्यंत संत्र्यांत रस आहे तोवर त्याचा वापर करा, रस संपल्यावर संत्र्याच्या साली फेकून द्या. बिग बॉसने माझ्याकडून मनोरंजन करुन घेतले पण फिनाले पर्यंत दुसऱ्यांनाच घेऊन गेले. बिग बॉस तुम्हाला माहितीय माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी ट्रॉफीची मानकरी होती. ट्रॉफी मी डिजर्व करत होती.

- Advertisement -

राखीच्या व्हिडीओनंतर तिच्या फॅन्सनी तिला पुन्हा बिग बॉसमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. तुला केवळ टिआरपीसाठी बोलावलं जाते असे देखील सांगितले. राखी बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून गेली होती. तिचा पती राकेशला तिने पहिल्यांदा सर्वांसमोर आणले होते. राखीला तिच्या नवऱ्यावरुन देखील बऱ्याचदा ट्रोल करण्यात आले होते.


हेही वाचा – Bigg Boss 15: Salmanला कोणी मोठं झालेलं पहावत नाही, बिचुकलेंना राग अनावर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -