घरमनोरंजनमला नवरा मिळू दे म्हणत... राखीने डोक्यावर फोडली अंडी

मला नवरा मिळू दे म्हणत… राखीने डोक्यावर फोडली अंडी

Subscribe

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आदिलसोबतच्या घटस्फोटानंतर राखीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यातून तिने आदिलवर अनेक आरोप केले होते. दरम्यान, अशातच आता राखीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी असं काही करत आहे जे पाहून ट्रोलर्स तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

राखीचा नवा व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंतचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी जिमच्या बाहेर येऊन पावसात भिजताना दिसत आहे. यादरम्यान, राखीने पावसात भिजता भिजता डोक्यावर 5 अंडी फोडली शिवाय अंडी फोडता फोडता ती “नवरा मिळू दे…. नवरा मिळू दे…. चांगला नवरा मिळू दे…. पकडा माझा नवरा कुठे आहे” असं म्हणताना दिसत आहे. राखीचं हे कृत्य पाहून तिथे उपस्थित असणारे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ खाली अनेकजण राखीला ट्रोल करताना दिसत आहेत. यावर एकाने लिहिलंय की, ही असं काहीपण का करत असते? तर दुसऱ्याने लिहिलंय की, ‘राखीच्या डोक्यावर परिणाम झालाय का?’ तर तिसऱ्याने लिहिलंय की, ‘तिने प्रसिद्ध होण्यासाठी स्वतःचा नाश केला आहे.’

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राखी तिचा पती आदिलला तुरुंगात पाठवल्यामुळे चर्चेत होती. राखीने पती आदिलवर बलात्कार, मारहान, धोका आणि विवाहबाह्य संबंध हे आरोप केले होते. राखी आणि आदिल यांचे मे 2022 मध्ये लग्न झाले होते. ज्याची घोषणा तिने जानेवारी 2023 मध्ये केली होती.

- Advertisement -

 


हेही वाचा :

शाहरुखला अभिनय येत नाही… पाकिस्तानी अभिनेत्रीची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -