बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. राखीचा अतरंगी अंदाज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. नुकताच राखीने तमन्ना भाटियाच्या ‘जेलर’ चित्रपटातील कावला गाण्यावर डान्स केला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राखीच्या डान्सवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
View this post on Instagram
नुकतीच राखी पापाराझींसमोर तमन्ना भाटियाच्या ‘जेलर’ चित्रपटातील कावला गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. राखीने यामध्ये तमन्नाची सिग्नेचर स्टेप कॉपी केली. दरम्यान, इतक्यात राखीने बाजूने जात असलेला ‘बिग बॉस 16’ फेम शालीन भानोतला पाहिलं आणि त्याला देखील तिच्यासोबत डान्स करण्यास सांगितले. राखी सावंतचा हा मजेदार व्हिडिओ पाहून नेटकरी खूप हसू लागले. सोशल मीडियावर राखीच्या या व्हिडिओवर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
अनेकजण राखीच्या डान्सवरुन तिला ट्रोल देखील करत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “राखी सावंत बेगम झाली आहे”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “बिचारा शालीन हिच्या नादात फसला.”
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राखी तिचा पती आदिलला तुरुंगात पाठवल्यामुळे चर्चेत होती. राखीने पती आदिलवर बलात्कार, मारहान, धोका आणि विवाहबाह्य संबंध हे आरोप केले होते. राखी आणि आदिल यांचे मे 2022 मध्ये लग्न झाले होते. ज्याची घोषणा तिने जानेवारी 2023 मध्ये केली होती.