घरमनोरंजनविवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत राखीने केली आदिल विरोधात तक्रार दाखल

विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत राखीने केली आदिल विरोधात तक्रार दाखल

Subscribe

ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप राखीने केला होता. आता सर्व प्रकरणात राखीने आदिल विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आदिलला आज अटक केली आहे.

राखीने आदिलवर लावले गंभीर आरोप

राखीने आदिल विरोधात विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली यावेळी आदिलने सांगितलं की, आदिलने तिच्याकडून लग्नाच्या नावाखाली सगळे दागिने आणि पैसे घेतले आहेत. त्याने माझ्याच घरात राहून माझ्याकडून सर्व चाव्या काढून घेतल्या आहेत आणि त्या मला परत करण्यास नकार देत आहे. तो मागील अनेक दिवसांपासून मला टॉर्चर करत आहे. त्याने प्रसिद्धी आणि बॉलिवूडच्या नावाखाली माझा वापर केला. त्याने माझ्याकडून सर्व पैसे काढून घेतले. शिवाय आता तो माझ्यापासून वेगळा झाला आणि त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहत आहे.

- Advertisement -

कोण आहे आदिलची गर्लफ्रेंड

आदिलच्या सिक्रेट गर्लफ्रेंडचे नाव तनु चंडेल असून ती इंदौरची आहे. इंदौरमध्ये आदिलचा एक फ्लॅट आणि एक बीएमडब्ल्यू कारही आहे. राखीने सांगितलं की, तनु एक बिझनेसवूमन असून मागच्या 8 वर्षांपासून ती बॉलिवूडमधील काही लहानमोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.

- Advertisement -

कधी सुरु झालं हे प्रकरण?
राखी मराठी बिग बॉसमध्ये गेल्यानंतर दोघांचं अफेअर सुरु झालं. ज्यावेळी राखी बिग बॉसमधून बाहेर पडली त्यावेळी तिला त्यांच्या अफेअरबद्दल समजलं. त्यावेळी राखीची आईदेखील आजारी होती त्यामुळे राखी खूप तणावाखाली वावरत होती. राखीने आदिलला समजावण्याचा प्रयत्न पण त्याने तिचं काहीही ऐकलं नाही. त्यामुळे आता राखीने त्याचा आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो व्हायरल केला आहे.

 


हेही वाचा :

‘वाळवी’च्या सक्सेस पार्टीत ‘वाळवी 2’ची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -