घरमनोरंजनराखीला आली चक्कर..., नेटकरी म्हणाली ही तर नौटंकी

राखीला आली चक्कर…, नेटकरी म्हणाली ही तर नौटंकी

Subscribe

ड्रामा क्वीन राखी सावंत मागील अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखीच्या आईचे निधन झाले. त्या दुःखातून बाहेर पडेपर्यंत राखीच्या आयुष्यात पुन्हा एक दुःखाचा डोंगर कोसळला. राखीचा पती आदिल खान दुर्रानीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप राखीने केला आणि त्याच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अशातच आता राखीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे राखीला अनेकजण ट्रोल करत आहेत.

राखीला आली चक्कर

 

View this post on Instagram

 

A post shared by Showbiz Spy (@showbizspy_)

राखीने तक्रार केल्यानंतर आदिलले राखीला अटक केली. यावर राखी मीडियासमोर बोलत होती, आदिल खूप मुलींसोबत चूकीचा वागला आहे. त्याला शिक्षा व्हायला हवी. असं म्हणता म्हणता राखीला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि तिला पाणी पाजलं. त्यानंतर राखीला कारमध्ये बसविण्यात आलं आणि ती तिच्या घरी निघून गेली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

- Advertisement -

नेटकऱ्यांनी केलं राखीला ट्रोल

राखीचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट्स करुन दिला ट्रोल करु लागले आहेत. नेटकऱ्यांच्या मते, राखीला चक्कर आली तेव्हा तिचा मोबाईल हातातच होता. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मते, राखीला खरोखर चक्कर आली असती तर तिच्या हातातून मोबाईल खाली पडला असता. त्यामुळे नेटकरी राखीला ट्रोल करु लागले आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

“त्यांना एकत्र पाहणं परिकथेसारखं”; करण जौहरची कियारा-सिद्धार्थसाठी खास पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -