प्रेग्नन्सी आणि गर्भपाताच्या चर्चांवर राखीने दिलं उत्तर; म्हणाली…

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 7 महिन्यांपूर्वी राखीने आदिलसोबत लग्न केलं नुकत्याच काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावरुन याबाबत खुलासा केला. अशातच राखी प्रेग्नंट होती आणि तिचा गर्भपात झाल्याच्या देखील चर्चा सुरु होत्या. आता या चर्चेवर राखीची प्रतिक्रिया समोर आली आहे. राखी आणि आदिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राखीच्या प्रेग्नन्सी आणि गर्भपाताबाबत पसरणाऱ्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे.

खरंतर, ‘राखीने तिच्या प्रेग्नन्सीबाबत बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमामध्ये घोषणा केली होती आणि आता तिचा गर्भपात झाला आहे’, अशी पोस्ट एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली होती. दरम्यान, आता राखी आणि आदिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी खोटी आहे, असं सांगितलंय.

प्रेग्नन्सीच्या चर्चेवर राखीने दिलं उत्तर

एका मुलाखतीमध्ये राखीने प्रेग्नन्सी आणि गर्भपाताच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ती म्हणाली की, “गर्भपात? तुम्ही वेडे आहात का?” त्यानंतर आदिलने सांगितलं “ही अफवा आहे, ही चुकीची माहिती आहे, असं काही झालेलं नाही.”

खासगी आयुष्यामुळे राखी चर्चेत
राखी सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखी बिग बॉस मराठीतून बाहेर आली. त्यानंतर तिने तिच्या लग्नाची बातमी जाहिर केली. बिग बॉस-14, नच बलिये, बिग बॉस-15 आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.


हेही वाचा :

हे राजकारणी मीडियात जाऊन जाहीरपणे… उर्फीचं ट्वीट पुन्हा चर्चेत