घरमनोरंजनराखी खलीला म्हणतेय; 'भाई मेरा बदला लो'

राखी खलीला म्हणतेय; ‘भाई मेरा बदला लो’

Subscribe

राखी सावंत सध्या तिला झालेल्या दुखापतीमुळे जोरदार चर्चेत आहे. पंचकूलामध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या सीडब्लयूई चॅम्पियनशीपमध्ये राखीने महिला रेसलर रोबेलचं कुस्तीचं चॅलेंज स्विकारलं. मात्र, हे चॅलेंज स्विकारणं तिला चांगलच महागात पडलं. कुस्तीच्या आखाड्यात रोबेलानं राखीला उचललं आणि खूप जोरात खाली आपटलं. यामध्ये राखीला अशी काही दुखापत झाली आहे की सध्या ती अंथरुणातून उठूच शकत नाहीये. दरम्यान, या कुस्तीदरम्यान घडलेल्या सगळ्या घटनांचे छोटे छोटे व्हिडिओ राखीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तसंच सध्या डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचा एक व्हिडिओसुद्धा तिने इन्स्टावर शेअर केला आहे. राखीच्या इन्स्टावरील एका व्हिडिओमध्ये ग्रेट रेसलर खली तिच्या तब्येतीची चौकशी करताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून खली आणि राखीची मैत्री असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या जुन्या मैत्रिणीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी खली तिथे गेला असताना, ‘खली भाई आप बुलबुल को बुलाकर उससे मुकाबला करो और मेरा बदला लेलो’… असे उद्गार राखी सावंतने काढले आहेत. याशिवाय राखी

डॉक्टरांना सांगितलं कुठे कुठे लागलं

याशिवाय राखीने इन्स्टावर तपासणीला आलेल्या डॉक्टरांसोबतचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये राखी डॉक्टरांना सांगते आहे की तिला डोक्यापासून पायापर्यंत दुखापत झाली आहे. मला आपटणारी रेसलर वेडी असल्याचंही ती डॉक्टरांना सांगते आहे. तर दुसरीकडे राखीने या सगळ्याच्या पाठीमागे तनुश्री दत्ताचा हात असल्याचंही म्हटलंय. तनुश्रीने त्या रेसलरला पैसे देऊन मला आपटवल्याचा आरोप राखीने केला आहे. राखीच्या या आरोपामुळे #MeToo मोहीमेनंतर राखी सावंत आणि तनुश्री दत्ता यांच्यातल्या वादाला एक नवं वळण लागण्याची शक्यता आहे. आता तनुश्री दत्ता राखीच्या या आरोपाला काय उत्तर देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

- Advertisement -


वाचा: तनुश्रीच्या इशाऱ्यावरुनच रेसलरने मला आपटले- राखी सावंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -