Rakhi Sawant Birthday: कधी बॉयफ्रेंडला थप्पड तर कधी रचलं स्वयंवर, जाणून घ्या राखीच्या अफेयर्सची कहाणी

राखी नेहमीच तिच्या बोल्डनेस आणि अफेयर्सच्या चर्चांमुळे लाईमलाइटमध्ये राहिली

Rakhi Sawant Birthday love Affairs of rakhi sawant
Rakhi Sawant Birthday: कधी बॉयफ्रेंडला थप्पड तर कधी रचलं स्वयंवर, जाणून घ्या राखीच्या अफेयर्सची कहाणी

टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून ड्रामा क्विन राखी सावंत जाणार आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी राखीने तिचा कथित पती राकेश सोबत बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचे तिने म्हटले आहे. खरंतर राखी सावंतचं लग्न नेमकं कोणासोबत झालंय याविषयी कोणालाच काहीच खरं माहिती नाही. पण राखीच्या अफेयर्स बाबतीत अनेक गोष्टी जगजाहीर आहेत.  राखी आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. राखी सावंतचे खरे नाव नीरू भेडा असे आहे. राखीने इंडस्ट्रीत येऊन तिचे नाव बदलले. राखी हिंदी तसेच अनेक मराठी सिनेमांमध्ये देखील आयटम साँगवर नाचताना दिसली होती. ‘अग्निचक्र’ या सिनेमातून राखीने सिनेसृष्टीत पदार्पण केले. राखी नेहमीच तिच्या बोल्डनेस आणि अफेयर्सच्या चर्चांमुळे लाईमलाइटमध्ये राहिली आहे. अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यातही अडकली आहे. जाणून घेऊया राखीच्या अफेयर्स विषयी.

इलेश परुजनवाला – राखी सावंत

राखी सावंतने राखी का स्वयंवर नावाचा एक रिअॅलिटी शो केला होता.या शोमुळे राखी सर्वाधिक लोकप्रिय झाली होती. राखी का स्वयंवर वेळी करोडो प्रेक्षकांच्या समोर राखीने इलेश पारुजनवालाला आपला पती मानले होते. मात्र काही काळात त्यांचे नात संपलं. त्यानंतर पती पत्नी और वो या मालिकेत दोघे एकत्र दिसले होते.

 

दिपक कलाल – राखी सावंत

यूट्यूबर दिपक हलाल याच्याशी राखीने लग्न केलं होते. त्यांच्या लग्नाची पत्रिका देखील व्हायरल झाली होती. २००९मध्ये त्यांनी लग्न केले होते. मात्र काही महिन्यांनी ते वेगळे झाल्याची घोषणा केली. नुकताच बिग बॉसच्या घरात राखीने माझा दिपक हलालशी फक्त साखरपुडा झाला होता रिअँलिटी शोच्या सर्व गोष्टी खऱ्या नसतात असे तिने म्हटले होते.

अभिषेक अवस्थी – राखी सावंत

अभिषेक अवस्थीसोबत राखीचे ३ वर्ष अफेर होते. राखी एकदा रागाच्या भरात अभिषेकच्या सर्वासमोर कानाखाली मारली होती. त्यानंतर त्यांचा ब्रेक अप झाला. त्यानंतर अनेक वर्षांनी ते नच बलियेच्या मंचावर एकत्र दिसले होते.

मीका सिंह – राखी सावंत

मीका सिंहने २००७मध्ये त्याच्या बर्थ डे दिवशी राखीला जबरदस्ती किस केलं होतं. त्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र राखी या प्रकारवर फार भडकली होती. तिने मीकाची पोलीस तक्रार केली. त्यानंतर दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते.


 

हेही वाचा – Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री केलेला अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह