राखीने दिला लग्नाला नकार

बॉलिवूड ड्रामा क्विन राखी सावंतने लग्नाला नकार दिला आहे. आपण साधे असल्यामुळे दीपकशी लग्न करु शकत नसल्याचे तिने आपल्या इन्स्टाग्रामवरून सांगितले आहे.

Rakhi-sawant-Deepak-Kalal
राखी सावंत आणि दीपक

बॉलिवूडमध्ये लग्नाची लाट उसळल्यानंतर आयटम गर्ल राखी सावंत चे लग्न ठरले असल्याची माहिती समोर आली होती. राखी सावंतने ही माहिती आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर टाकली होती. याच बरोबर पत्रकार परिषद घेऊन तिने दिपक कलाल याच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच आपण दीपकशी लग्न करणार नसल्याचा तिने सांगितले आहे. राखीच्या ड्राम्याबद्दल माहिती असलेल्या फॅन्सचा अंदाज शेवटी खरा ठरला आहे.

न्यूड लग्न करणार होती राखी

राखीने लग्नाचा ड्रामा चांगलाच रंगवला होता. यामध्ये ती अमेरिकेत लग्न करणार असल्याचे सांगितले होते. अमेरिकेत न्यूड लग्न करणार असल्याचे तीने सांगितले होते. लग्नासाठी तिने दागीणे खरेदी केल्याचेही व्हिडिओ तिने टाकले होते. लग्नानंतर मधुचंद्र लाईव्ह करणार असल्याचा दावा तिने केला होता. यामुळे राखी काही न करता चर्चेत आली होती. मात्र काही दिवसांवनंतर राखीने लग्न तोडले असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर तिने दीपकला इन्स्टाग्रामवर ब्लॉकही केले आहे.

 

View this post on Instagram

 

#deepakkalal im very upset ?

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on