घरताज्या घडामोडीराखी सावंत बऱ्याच दिवसांनी बरळली; म्हणे, Tom Cruise मला दर महिन्याला फोन...

राखी सावंत बऱ्याच दिवसांनी बरळली; म्हणे, Tom Cruise मला दर महिन्याला फोन करतो

Subscribe

राखी सावंतला मुंबईत स्पॉट करण्यात आले. त्यावेळी राखी पापाराझींसमोर  मी आता संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, असे म्हणाली.  हॉलिवूडमध्ये मला सगळे ओळखतात.

ड्राम गर्ल राखी सावंत बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे जी केवळ अभिनेत्री नाही तर सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. नुकतीच राखी अभिनेता रणबीर सिंह सोबत रेड कार्पेटवर दिसली होती. राखी नेहमीच अनेक खुलासे करत नको त्या गोष्टी बरळताना दिसत असते. परंतु गेले काही दिवस राखी सावंत थोडी शांत झाली होती परंतु बऱ्याच दिवसांनी राखीने नवे विधान केले आहे. राखीने या वेळी स्वत: ला हाय सोसयटी म्हणत जगातील प्रसिद्ध टॉम क्रूझशी बोलत असल्याचा दावा केला आहे. राखीचा हा दावा पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

राखी सावंतला मुंबईत स्पॉट करण्यात आले. त्यावेळी राखी पापाराझींसमोर  मी आता संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, असे म्हणाली.  हॉलिवूडमध्ये मला सगळे ओळखतात. टॉम क्रूझ देखील मला ओळखतात असे राखी म्हणाली. माहिन्यातून एकदा टॉम क्रूझ मला फोन करतात. एंजेलिना जॉली देखील मला फोन करते. दोघेही माझ्याशी इन्स्टाग्रावर बोलतात. मी सगळ्यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes TV (@etimes_tv)

- Advertisement -

राखी पुढे म्हणाली, कालच मी काइली जेनर सोबत बोलले. मी तिला विचारलं कशी आहेस ? मला चांगले कपडे पाठव. काइली मला हॉलिवूडचे कॉस्ट्यूम पाठवणार आहे. काइली मला म्हणाली, तू जेव्हाही अमेरिकेला येशील तेव्हा मला नक्की भेट. राखी पुढे म्हणाली, मी आता हाय सोसायटीत राहणारी अभिनेत्री आहे. मी मोठ्या लोकांना भेटते. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. सगळेच मोठे स्टार्स माझ्यावर प्रेम करतात. मी या सगळ्यांमुळे फार खुश आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  …म्हणून ‘द मॅट्रिक्स’ची ऑफर लारा दत्ताने 2001 मध्ये नाकारली

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -