घरमनोरंजनराखी सावंतने केला चित्रपटगृहात 'बिल्ली बिल्ली' गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

राखी सावंतने केला चित्रपटगृहात ‘बिल्ली बिल्ली’ गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच तिच्या खासगी आयुष्येमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आदिलसोबतच्या घटस्फोटानंतर राखीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यातून तिने आदिलवर अनेक आरोप केले होते. दरम्यान, अशातच आता राखीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती डान्स करताना दिसत आहे.

शुक्रवारी सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रदर्शित झाला. जो पाहण्यासाठी राखी चित्रपटगृहात पोहोचली होती. यावेळी राखीने चित्रपटातील बिल्ली बिल्ली गाण्यावर डान्स केला. राखीसोबत अनेक प्रेक्षकही या गाण्यावर डान्स करताना दिसले. सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये राखीने पूर्ण ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. यात राखीने गोल्डन कलरचा अनारकली सलवार सूट परिधान केला आहे. यासोबतच त्यावर मॅचिंग ओढणी देखील घेतली आहे. राखीच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत.

दरम्यान, सलमान खानचा हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. सलमानने या चित्रपटाची निर्मिती केली असून हा फरहाद सामजी दिग्दर्शित आहे. या चित्रपटात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :

‘किसी का भाई किसी की जान’ने अवघ्या तीन दिवसात केला 50 कोटींचा टप्पा पार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -