घरताज्या घडामोडीNRC: नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी राखी सावंतने दिलाय रामबाण उपाय

NRC: नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी राखी सावंतने दिलाय रामबाण उपाय

Subscribe

देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या कायद्याविरोधात आंदोलन केली जात आहेत. दिल्लीतील शाहीन बाग असो वा उत्तर प्रदेशातील लखनऊ किंवा दक्षिण भारतातील केरळ राज्य असो, सर्वत्र नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत. नुकतचं बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने यासंदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. तिने नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रामबाय उपाय दिला आहे.

राखीने असा सल्ला दिला की, ‘माझ्याकडे एक उपाय आहे. सीएए आणि एनआरसीला जे घाबरत आहे आणि त्यांना असं वाटतं की, त्यांच्या कुटुंबियांने त्यांच्यासाठी जन्म प्रमाणपत्र ठेवले नाही. मग तुम्ही का चिंता करता? जर आपल्याकडे जुनी कागदपत्र नसतील तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही सर्व भारतात राहा आणि खूप कर्ज घ्या. तुम्ही भारतीय आहात हे बँक सिद्ध करेल. मित्रांनो चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही.’

View this post on Instagram

Jaao lone lelo daro Matt NRC se?

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

- Advertisement -

राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याशिवाय नेटकरी या व्हिडिओ खूप प्रतिसाद देत आहेत. राखी सावंतने बॉलिवूड चित्रपटांसह टिव्हीवरील सिरीयलमध्ये देखील काम केलं आहे. तसंच लवकरच राखीची आई कश्मीरी पंडितांवर आधारित असलेल्या ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Man vs Wild: शुटींग दरम्यान रजनीकांतला दुखापत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -