घरट्रेंडिंगराखी सावंतने शेअर केला नवऱ्यासह लग्नातला फोटो

राखी सावंतने शेअर केला नवऱ्यासह लग्नातला फोटो

Subscribe

राखी सावंतने आपल्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो नवऱ्यासोबतचा आहे.

बॉलीवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच तिच्या व्हिडिओ, विचित्र कमेंट आणि वागणुकीमुळे चर्चेत असते. मात्र, मागच्या संपूर्ण वर्षात राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत राहिली. राखी सावंतने गुपचूप लग्न केले ही चर्चा गेले कित्येक दिवस रंगत आहे. मात्र, या ड्रामा क्विनच्या लग्नावर कोणाचाही विश्वास नव्हता. दरम्यान, राखीने नुकताच एक लग्नाचा फोटो शेअर करुन पुन्हा लग्नाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.

- Advertisement -

‘नवरा मीडियापासून दूर राहण्याचे पसंत करतो’, असे कारण देत राखीने नेहमीच त्याचा फोटो शेअर करणे टाळले होते. पण, आता राखी सावंतने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये राखी नवरीच्या वेशात असून तिने नवऱ्याचा हात पकडलेला दिसत आहे. मात्र, याही वेळी राखीने चालाखीने नवऱ्याचा फोटो लपवला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘माझ्या लग्नाचा फोटो’ असे देखील म्हटले आहे. त्यावर युजर्सने तिच्याकडे पुन्हा एकदा पतीचा फोटो दाखवण्याची मागणी केली आहे.

View this post on Instagram

Meri shadi ki picture

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

- Advertisement -

खासगी समारंभात केले लग्न

राखी सावंतने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात आपले लग्न झाले असल्याचा खुलासा केला होता. एका एनआरआयशी लग्न केले असल्याचे तिने स्पष्ट केले होते. मात्र, राखीने त्याला मीडियासमोर आणले नव्हते. त्यामुळे राखीच्या नवऱ्याचा चेहरा कोणी बघितलेला नव्हता. पण, राखीने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये देखील राखीच्या नवऱ्याचा केवळ हात दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राखीने तिच्या नवऱ्याचा चेहरा लपवल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: प्रसिद्धीसाठी काहीही; सनी लिओनीनं मास्क म्हणून डायपर घातला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -