बिग बॉस फेम राखी सावंत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे असो किंवा पापाराजी सोबत केलेल्या मस्तीमुळे असो चर्चेत असते. अशातच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा नवरा आदिल खान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने राखीबद्दल प्रेस कॉन्फ्रेरन्स घेत काही खुलासे केले. तिच्यावर काही गंभीर आरोप सुद्धा त्याने लावले. याच दरम्यान कॉन्ट्रोवर्शियल क्विन राखी आपला पहिला उमराह करण्यासाठी मक्का-मदीनात गेली आहे. (Rakhi Sawant first umharh)
राखी सावंतने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा उमराह केला. सोशल मीडियात तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तिला फॅन्सने घेरले आहे. मदीनात राखीने बुर्का घातल्याचे दिसून येत आहे. फॅन्स तिच्यासोबत फोटो सुद्धा काढत आहेत. एका फॅनने तिला राखी म्हणून संबोधले तेव्हा तिने मला राखी नाही तर फातिमा बोलावे असे म्हटले.
View this post on Instagram
राखीने आणखी एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात ती अल्लाह समोर इबादत करताना दिसून येत आहे. काही लोक तिच्या व्हिडिओला लाइक करतायत कर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने असे म्हटले की, ड्रामा बंद कर, आता हे सहन होत नाहीयं. दुसऱ्याने म्हटले, ओवरअॅक्टिंग करायची नाही, उमराह करायचा आहे.
View this post on Instagram
राखीने का बदलला होता धर्म?
राखी सावंतने पती आदिल खान दुर्नानी सोबत निकाह केल्याने इस्लाम धर्म स्विकारला होता. तिने मे 2022 मध्ये आदिल सोबत गुपचुप निकाह केला हता. याची माहिती तिने जानेवारी 2023 मध्ये दिली होती. मात्र निकाह केल्याच्या काही काळातच राखी आणि आदिलचे नातेसंबंध बिघडू लागल. अभिनेत्रीने पतीवर गंभीर आरोप लावून त्याच्या विरोधात पोलीस तक्रार ही केली होती.
तर आदिल गेल्या सहा महिन्यांपासून मैसूर जेलमध्ये होता. आता बाहेर आल्यानंतर राखी सावंत ही खोटी असल्याचे सांगत आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले आहेत. तसेच राखीच्या विरोधात अॅक्शन घेण्याची सुद्धा धमकी दिली आहे.
हेही वाचा- हिजाब घालून उमराहसाठी राखी रवाना; व्हिडीओ व्हायरल