घरमनोरंजनलॉरेंन्स बिश्नोई गँगकडून राखीला धमकीचा ईमेल, सलमानपासून दूर रहा अन्यथा...

लॉरेंन्स बिश्नोई गँगकडून राखीला धमकीचा ईमेल, सलमानपासून दूर रहा अन्यथा…

Subscribe

सलमान खानला गेल्या काही दिवसांपूर्वी जीवेमारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. या धमकीच्या मेसेजमागे सिद्धू मूसेवाला याची हत्या करणारे गँगस्टर लॉरेंन्स बिश्नोई याचा हात आहे. यामुळेच अभिनेत्याच्या सुरक्षिततेत वाढ केली गेली. आता एका नव्या रिपोर्टनुसार असा दावा केला जात आहे की, राखी सावंतला एक धमकीच्या ईमेल आला आहे. ज्यामध्ये तिला या प्रकरणापासून दूर राहण्याचे सांगण्यात आले आहे.त्याचसोबत त्यांनी ईमेल मध्ये असे लिहिले गेले आहे की, “गँग मुंबईत सलमान खानला जीवेमारण्याचा प्लॅन करत आहे. किती ही कठोर सुरक्षा असो आम्ही तसे करणार आहोत. ही शेवटची वॉर्निंग आहे. अन्यथा तु सुद्धा तयार रहा.”

रिपोर्टनुसार, ड्रामा क्विनला मिळालेला धमकीचा ईमेल गुर्जर प्रिंस नावाच्या एका व्यक्तीने पाठवला आहे. त्याने असा दावा केला आहे की, तो लॉरेंन्स बिश्नोई गँग मधीलच आहे. राखी सावंतला काल दोन वेळा धमकी देणारे ईमेल मिळाले आहेत. एक सकाळी ७.२२ वाजता आणि दुपारी १.१९ वाजता.

- Advertisement -

खरंतर एका महिन्यापूर्वी राखीने सलमानने समर्थन दिले होते. तिने एक व्हिडिओ असे सांगितले होते की, ज्यामध्ये तिने असे म्हटले होते मी सलमान भाईकडून बिश्नोई समाजाची माफी मागत आहे. माझ्या भावावर वाईट नजर ठेवू नका.

- Advertisement -

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तर त्याचा आगामी सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ मध्ये तो मुख्य भुमिकेत झळकणार आहे. फरदाह सामजी द्वारे निर्देशित हा अॅक्शन-कॉमेडी सिनेमा ईदच्या दिवशी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मल्टीस्टार असलेल्या या सिनेमात पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर सुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे.


हेही वाचा: जेनिफर विंगेट आणि करण ग्रोवरचे ‘या’ कारणामुळे मोडले लग्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -