घरमनोरंजनराखी म्हणतेय... पंतप्रधान मोदींएवढी मेहनत मीसुद्धा घेतलीय!

राखी म्हणतेय… पंतप्रधान मोदींएवढी मेहनत मीसुद्धा घेतलीय!

Subscribe

बिग बॉस १३ मधील काही स्पर्धकांविषयी ती या व्हिडीओमध्ये बोलत आहे. या व्हिडीओमध्ये ती स्पर्धकांबद्दल राग व्यक्त करताना दिसत आहे.

वक्तव्य, लुक्स या आणि अशा अनेक कारणांमुळे राखी सावंत नेहमी चर्चेत राहते. नुकताच राखी सावंतने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. बिग बॉस १३ मधील काही स्पर्धकांविषयी ती या व्हिडीओमध्ये बोलत आहे. या व्हिडीओमध्ये ती स्पर्धकांबद्दल राग व्यक्त करताना दिसत आहे.

- Advertisement -

बिग बॉस १३ मधील स्पर्धक शेफाली जरीवालावर राखी सावंतने रोष व्यक्त केला आहे. बिग बॉसमधील एका टास्क दरम्यान शहनाज गिलने बिग बॉसमधील स्पर्धकांना त्रास दिला होता. त्यामुळे त्रासलेल्या शेफाली जरीवाला हिने शहनाजला पंजाबची राखी सावंत म्हटलं होतं. या विषयीचा राग राखीनं तिच्या व्हिडिओमध्ये व्यक्त केला आहे.

काय म्हणते राखी?

या व्हिडीओमध्ये राखी स्वतःची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करत आहे. ‘राखी सावंत इस दुनियामे सिर्फ एक ही है’ असं म्हणत तिनं स्वत:बद्दल बोलायला सरुवात केली. ‘राखी सावंत बनायला फार मेहनत घ्यावी लागते. मोठ्या कष्टाने मी या पदावर पोहोचले आहे. ज्याप्रमाणे मोदीजींनी मेहनत घेऊन आज त्यांचे पद गाठले आहे तशीच मेहनत मीसुद्धा घेतली आहे आणि त्यामुळेच राखी सावंत आज या पदावर आहे ‘ असं ती सांगत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -