Video: राखीनं पातळीचं ओलांडली! राहुल महाजनचं केलं वस्त्रहरण

Rakhi Sawant is possessed by ghost, rips Rahul Mahajan's clothes
Video: राखीनं पातळीचं ओलांडली! राहुल महाजनचं केलं वस्त्रहरण

कलर्स वाहिनीवरील बिग बॉस शो नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून यंदाचा बिग बॉस सीझन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता पुन्हा एकदा बिग बॉस सीझन १४ चर्चेत आला आहे. ते पण अभिनेत्री राखी सावंतच्या विचित्र कारनाम्यांमुळे. राखी सावंतने अक्षरशः पातळीचं ओलांडली आहे. तिने बिग बॉसच्या भर शोमध्ये राहुल महाजनचं वस्त्रहरण केलं आहे. सध्या राखीचा आणि राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे.

कलर्स टीव्हीने आपल्या इन्स्टाग्रामच्या अधिकृत पेजवर राखी आणि राहुलचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंत चक्क राहुलचं धोतर सगळ्यासमोर फाडताना दिसत आहे. एका ठिकाणी तर राखी जेव्हा राहुलचं धोतर फाडते तेव्हा राहुल जोरात खाली पडतो. राखीच्या अशा वागणुकीमुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांसह सोशल मीडियावरील युजर्स राखीवर टीका करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी राखीवर संताप व्यक्त केला असून तिला चांगलंच सुनावलं आहे. राखी सध्या बिग बॉसच्या घरात अनेक नौटंकी करताना दिसत आहे. मध्यंतरी तिच्या अंगात जुली ते भूत आलं होत. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.


हेही वाचा – लवकरच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस