घरट्रेंडिंगVideo : राखी सावंत म्हणते 'घाबरु नका, करोना व्हायरस मी करणार नष्ट'

Video : राखी सावंत म्हणते ‘घाबरु नका, करोना व्हायरस मी करणार नष्ट’

Subscribe

बॉलीवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत करोना व्हायरस नष्ट करण्यासाठी चीनमध्ये दाखल झाली आहे.

बॉलीवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच तिच्या व्हिडिओमुळे चर्चेत असते. व्हिडिओद्वारे विचित्र कमेंट किंवा वागणुकीमुळे ती नेहमीच बातम्यांमध्ये असते. यावेळी राखीने करोना व्हायरस नष्ट करणार असल्याचे विधान केले आहे. तसेच हा करोना व्हायरस नष्ट करण्यासाठी मी चीनला जात आहे आणि हा व्हायरस नष्ट करुनच मी पुन्हा भारतात परतणार असल्याचे सांगितले आहे. तिने तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओला ७६ हजारापेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत.

काय म्हणते राखी सावंत?

राखी सावंतने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘करोना व्हायरस नष्ट करण्यासाठी मी चीनला जात आहे’. तसेच या व्हिडिओमध्ये राखी विमानात बसली असून ती आपला व्हिडिओ रेकोर्ड करताना दिसत आहे. ‘मी आता फ्लाइटमध्ये आहे आणि मी आता चीनमध्ये जाऊन करोना व्हायरस नष्ट करुनच येणार आहे. त्यामुळे आता कोणीही आजारी पडणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मी आता चीनला जात आहे. माझ्याकरता तुम्ही प्रार्थना करा की, मी व्यवस्थितरित्या पुन्हा भारतात येईन’. त्याचप्रमाणे ती पुढे म्हणते की, ‘मी करोना व्हायरसला मारण्यासाठी नासाकडून स्पेशल औषध घेऊन जात आहे’.

- Advertisement -

त्यानंतर राखी सावंत फ्लाइटमधून उतरल्यानंतर म्हणते की, ‘मित्रांनो मी चीनमध्ये उतरली आहे आणि माझा चेहरा देखील चीनी लोकांसारखा दिसत आहे. ‘चीनी मीनी चाउ-चाउ, व्हायरस को खाऊं-खाऊं..’, असे देखील ती म्हणत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – याने राज ठाकरेंना दिली वडापावची ‘लाच’!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -