घरट्रेंडिंगVideo: राखी म्हणते, 'पापं केली म्हणून झाला करोना...सगळ्यांनी देवाच्या चरणी या'!

Video: राखी म्हणते, ‘पापं केली म्हणून झाला करोना…सगळ्यांनी देवाच्या चरणी या’!

Subscribe

बॉलीवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच तिच्या व्हिडिओमुळे चर्चेत असते. व्हिडिओद्वारे विचित्र कमेंट किंवा वागणुकीमुळे ती नेहमीच बातम्यांमध्ये असते. काहीदिवसांपूर्वी राखीने आपण करोना व्हायरस नष्ट करायला चीनला निघालो आहोत असा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता करोनाविषयी राखीने आणखी एक व्हीडीओ शेअर केला आहे. यात माणसाने खूप पापं केली आहेत. म्हणून करोना होत आहे…सगळ्यांनी देवाच्या चरणी जा..आणि करोनाला पळवा असे आवाहन राखीने या व्हीडीओत केले आहे.

View this post on Instagram

Please please Suni lo meri baat

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

- Advertisement -

काय म्हणाली राखी

राखी म्हणते, कृपा करून माझं ऐका! करोना व्हायरस सगळीकडे पसरत आहे. सगळे तुम्हाला सांगतायत हात धुवा, पाय धुवा.. सगळं धुवा पण हा आत्मा कसा धुणार. आपण खूप पापं केली आहेत. जगात सगळ्यांनी खूप पापं केली आहेत. तु्म्हाला काय वाटतं हा करोना व्हायरस कुठून आला आहे. करोना लोकांना धडा शिकवायला आला आहे. मी सांगते तुम्ही अजूनही देवाच्या चरणी या. आपल्या पापांची माफी मागा. करोना व्हायरस हिंदू, मुस्मीस,शिख अशा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना होत आहे. गरीब, श्रीमंत अशा सगळ्यांना तो होत आहे. कृपया देवाच्या चरणी या, अल्लाहच्या चरणी या गुडघ्यावर बसून माफी मागा…माझी खात्री आहे तुम्हाला करोना व्हायरस कधी होणार नाही.

- Advertisement -

आधी ही करोना विषयी शेअर केलेला व्हीडिओ

करोना व्हायरस नष्ट करण्यासाठी मी चीनला जात आहे आणि हा व्हायरस नष्ट करुनच मी पुन्हा भारतात परतणार असल्याचे सांगितले आहे. राखी सावंतने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘करोना व्हायरस नष्ट करण्यासाठी मी चीनला जात आहे’. तसेच या व्हिडिओमध्ये राखी विमानात बसली असून ती आपला व्हिडिओ रेकोर्ड करताना दिसत आहे. ‘मी आता फ्लाइटमध्ये आहे आणि मी आता चीनमध्ये जाऊन करोना व्हायरस नष्ट करुनच येणार आहे. त्यामुळे आता कोणीही आजारी पडणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मी आता चीनला जात आहे. माझ्याकरता तुम्ही प्रार्थना करा की, मी व्यवस्थितरित्या पुन्हा भारतात येईन’. त्याचप्रमाणे ती पुढे म्हणते की, ‘मी करोना व्हायरसला मारण्यासाठी नासाकडून स्पेशल औषध घेऊन जात आहे’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -