घरमनोरंजन'बाजीराव'च्या शोधात मुंबईच्या रस्त्यावर फिरतेय राखी सावंत

‘बाजीराव’च्या शोधात मुंबईच्या रस्त्यावर फिरतेय राखी सावंत

Subscribe

राखीचा पती रितेश नेमका कोण आहे याचा चर्चा सतत सुरु झाल्या.

बिग बॉसचा १४ वा सीझन दणाणून सोडणारी बॉलिवूडची ड्रामा क्लीन राखी सावंत नेहमी चर्चेत असते. काही ना काही जगावेळ करत चाहत्यांचे लक्ष वेधत असते. दरम्यान बॉग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतल्यानंतर बिग बॉसच्या घरात अनेकदा तिने आपला पती रितेशचा उल्लेख केला. त्यामुळे राखीचा पती रितेश नेमका कोण आहे याचा चर्चा सतत सुरु झाल्या. पण आता चक्क मस्तीनीच्या वेशात राखी सावंत मुंबईच्या रस्त्यांवर बाजीरावचा शोधात निघाली आहे. राखी सावतंचा या मस्तीनीच्या वेशातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये राखी सावंतने डिट्टो बाजीराव मस्तानी चित्रपटातील मस्तानीचा वेश परिधान केला आहे. या वेशात ती मुंबईच्या रस्त्त्यांवर फिरताना दिसतेय. या व्हिडिओत राखी बाजीरावच्या शोधात निघाले असे म्हणत नवऱ्याला भेटण्याची एक संधी आली पण असं होऊ शकले नाही. असेही ती सांगतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

- Advertisement -

तर व्हिडिओत पुढे राखी सांगतेय की, ‘ना लस मिळतेय नाही ना कपड्यांची दुकाने उघडत आहेत त्यामुळे आता मी भटकत आहे. ना मुंबईत सर्वकाही ठीक होत आहे आणि लॉकडाऊनही कायम आहे. मी खूप त्रासले आहे. मी खूप दुःखी आहे. ‘मी ‘खतरों के खिलाडी’ शोमध्येही जाऊ शकले नाही आणि विवाहित असूनही माझा पती मला भेटत नाही. मला एक शो मिळाला होता ‘नच बलिए’ पण आता हा शो देखील बंद करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ही एक संधी होती माझ्याकडे माझ्या नवऱ्याला भेटण्याची. पण आता हा शो बंद झाल्यामुळे मला त्याला कधीच भेटता येणार नाहीये. तुम्ही मला मीरा म्हणा किंवा मस्तानी मी माझ्या बाजीरावला शोधत आहे.’

- Advertisement -

राखीची ही बडबड सुरु असतानाच त्या ठिकाणाहून एक डब्बेवाला येत असतो त्याला पाहताच राखी म्हणते, ‘तुम्ही बाजीराव आहात का?’ त्यावर तो व्यक्ती ‘मी तर टिफिन पोहोचवण्याचं काम करतो.’ असे सांगतो. त्यावर राखी त्याला म्हणते, ‘मग ठीक आहे. मला वाटलं तुम्ही बाजीराव आहात. मी मस्तानी आहे. उद्यापासून मलाही टिफिन द्या.’


Sushant Singh Rajput Death : सुशांत सिंह राजपूतवरील वादग्रस्त ट्विटमुळे दिग्दर्शक होतोय ट्रोल

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -