घरमनोरंजनVideo: कोरोना लस घेताना राखीची नौटंकी बघाच

Video: कोरोना लस घेताना राखीची नौटंकी बघाच

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत ही ‘ड्रामा क्वीन’ या नावाने प्रसिद्ध आहे. राखी सावंत अशी काही वक्तव्य किंवा नौटंकी करत असते, ज्यामुळे ती सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. असे असले तरी राखी तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच लोकांचं मनोरंजन करत असते. असाच राखीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये ती कोरोनाची लस घेताना दिसत आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने सरकार प्रत्येक नागरिकाला कोरोना लस घेण्याचे आवाहन करत आहे आणि हेच आवाहन पाळत आता राखी सावंत देखील कोरोनाची लस घेण्यास पोहोचली आहे.

कोरोना लसीकरण केंद्रावर पोहोचल्यानंतर राखीला अचानक लस घेताना भिती वाटू लागते. एवढेच नाही तर ही भीती दूर करण्यासाठी ती मोठ-मोठ्याने गाणं गाताना देखील दिसतेय. हाच तिचा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे.राखी सावंतने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हे पाहता येईल की राखी खूप घाबरली आहे आणि ती नर्सला म्हणाली, ‘मी एक नवीन गाणं गाऊ … माझा व्हिडिओ रिलीज होणार आहे .. मेरे ड्रीम में तेरी एंट्री … मेरे ड्रीम में तेरी एंट्री …. हे गाणं राखी गात असताना तिला कोरोनाची लस नर्स देतात. आणि हे तिला कळत देखील नाही…

- Advertisement -

कोरोनाची लस घेतल्यानंतर राखी व्हिडिओमध्ये सांगते की, तिला कोव्हशील्डचा पहिला डोस मिळाला आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूपच आवडला असून चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच त्यावर मजेदार प्रतिक्रियाही नेटकरी देताना दिसताय.

बघा हा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -