राखी सावंत आता देणार अभिनयाचे धडे; दुबईत सुरू केली कार्यशाळा

बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंत मागील अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखी सतत तिचा पती आदिलविरोधात वेगवेगळे खुलासे करत आहे. सोशल मीडियावर राखीचे रडणारे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. अशातच आता राखीने तिच्या करिअरकडे पूर्णपणे लक्ष देण्याचा निर्णय घेत राखीने स्वतःची एक अभिनय कार्यशाळा सुरु केली आहे.

राखी सावंत शिकवणारा अभिनय

राखी सावंतने दुबईत अभिनय कार्यशाळा सुरु केली आहे. या कार्यशाळेतून राखी नवख्या कलाकारांना तसेच अभिनयाची आवड असणाऱ्यांना अभिनय शिकवला जाणार आहे. शिवाय त्यांच्यासाठी बॉलिवूडमध्ये जाण्याचा मार्ग देखील खुला करण्यात येणार आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली की, “मी अभिनयाची कार्यशाळा सुरु केली असून या कार्यशाळेच्या माध्यमातून मी दुसऱ्या देशातील अभिनयाची आवड असलेल्या मंडळींना अभिनयाचं प्रशिक्षण देऊन त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळवून देणार आहे.” असं राखी म्हणाली.

आदिलवर विवाहबाह्यसंबंधाचे आरोप

 

View this post on Instagram

 

A post shared by Waahiid Ali Khan (@waahiidalikhan)

राखीने आदिलवर विवाहबाह्यसंबंधाचे आरोप केले आहेत. शिवाय काही दिवसांपूर्वी आदिलचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो देखील तिने शेअर केले होते. त्यानंतर राखीने आदिलवर फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

 


हेही वाचा :

शहनाज शॉर्टकटच्या माध्यमातून पैसा कमावते… सोना महापात्राचं ट्वीट चर्चेत