घरट्रेंडिंगराखीने आता अनुप जलोटांसोबतची 'ही' इच्छा केली व्यक्त

राखीने आता अनुप जलोटांसोबतची ‘ही’ इच्छा केली व्यक्त

Subscribe

राखी सावंत हिला भजनसम्राट अनुप जलोटा यांच्यासोबत आंघोळ करायची इच्छा असल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याने सर्वांनाच चक्रावून सोडले आहे.

ड्रामा क्विन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून मीटू चळवळीसंबंधीत वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत होती. मात्र आता तर तिने अगदीच चक्रावून टाकणारे वक्तव्य केले आहे. राखी सावंत हिला भजनसम्राट अनुप जलोटा यांच्यासोबत आंघोळ करायची इच्छा असल्याचे तिने म्हटले आहे. नुकतेच बिग बॉस १२ चे स्पर्धक राहिलेले भजनसम्राट अनुप जलोटा त्यांच्या तरुण गर्लफ्रेंड जसलिनसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा राखी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनुप जलोटा यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.

वाचा : राखी सावंत तनुश्रीला म्हणते ‘चार आणा’ दे!

- Advertisement -

वाचा : आणि तिने राखी सावंतला

मी अनुपला विकत घेईन – राखी सावंत 

राखी सावंत हिने नुकतीच व्हुट बीग बझमध्ये उपस्थिती दर्शवली होती. यावेळी या शोचा होस्ट अपारशक्ती खुराना याने राखीला प्रश्न विचारला होता. त्याला अशा पद्धतीचे मजेशीर उत्तर तिने दिले. प्रश्न असा होता की, बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी कोणती गोष्ट दान करावी? त्यावर राखी म्हणाली की, जसलिनने तिचे कथित प्रियकर अनुप जलोटा यांना दान करावं, मी त्यांना खरेदी करायला एका पायावर तयार आहे. मला त्यांच्यासोबत आंघोळ करायची आहे. जसलिनने त्यांच्यासाठी मेकअप-कपडे सोडायला नकार दिला मग आता उरलंच काय? असं मत राखीने यावेळी मांडलं.

- Advertisement -

वाचा : Video: अनुप जलोटांसोबत ‘तिचा’ रोमँटिक डान्स

वाचा : अनुप आणि जसलीनच्या जोडीवर नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिक्रीया!

वादग्रस्त वक्तव्यासाठी राखी फेमस 

राखी सावंतने यापूर्वीही अनेकदा अशी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. नुकतेच तिने तनुश्री आणि नाना पाटेकर यांच्यातील वादात उडी घेत तनुश्रीला लेस्बियन म्हटले होते. तर प्रत्येकवेळी मीडियावर आधारीन वक्तव्य करत तिने सनसनाटी निर्माण केली आहे. आता राखीने अनुप जलोटा यांच्यासमोर ठेवलेला प्रस्ताव ते स्विकारतात का, अनुपजी याला काय उत्तर देतात, हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -