Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन राखी सावंत करणार दुसऱ्यांदा लग्न

राखी सावंत करणार दुसऱ्यांदा लग्न

त्यामुळे आता राखीचा होणारा नवरा कोणता अभिनेता असणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत नेहमी तिच्या विचित्र वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असते. आता राखी पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती स्वत: राखीने दिली आहे. त्यामुळे तिचा होणार नवरा कोणता अभिनेता असणार अशा चर्चा रंगल्या आहेत. राखी नेहमी ती विवाहित असल्याचा दावा करत असते. तर मग तिचे लग्न झालेले असताना दुसऱ्यांदा ती कोणाशी लग्न करणार आहे असा सर्व प्रेक्षकांना पडला आहे. अभिनेत्री राखी ही पुन्हा कोणत्या अभिनेत्यासोबत नाहीतर तिचा नवरा रितेशसोबत पुन्हा दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. राखीच्या म्हण्यानुसार रितेशला भारतात येवून पुन्हा तिच्याशी लग्न करायचे आहे आणि यावेळी ती सर्वांच्या समोर लग्न करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

 एका मुलाखतीदरम्यान राखी म्हणाली होती की, राखी आणि रितेशचे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणे होत असते. रितेशच्या विझामध्ये काहीतरी समस्या येत आहे आणि काही कायदेशीर गोष्टी आहेत ज्या तो पूर्ण करत आहे. यानंतर तो आमच्या नात्याबद्दल सर्वांसमोर बोलणार आहे. राखीचे २०१८ मध्ये रितेशसोबत लग्न झाले होते. त्यावेळी तिने लग्नातील तिचे काही फोटो शेअर केले होते. ज्यात ती वधूच्या गेटअपमध्ये मंडपात दिसत होती, मात्र या फोटोत तिचा नवरा दिसत नव्हता राखीच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली असलीतरी अजूनही तिच्या नवऱ्याला कोणी पाहिले नाही. राखीचा नवरा कधीही मीडियासमोर आला नाही पण ती नेहमी माझे रितेशसोबत लग्न झाल्याचे सांगत असते. आता राखी पुन्हा सर्वांसमोर लग्न करत असल्याने तिचा नवरा रितेशचा चेहरा सर्वांच्या समोर येण्याची शक्यता आहे.


- Advertisement -

हे वाचा- नाईकांची ‘मल्याळी’ सून आहे तरी कोण?

- Advertisement -