Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन आधी सुहागरात आणि मग लग्न...; आदिलला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर राखीचा खुलासा

आधी सुहागरात आणि मग लग्न…; आदिलला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर राखीचा खुलासा

Subscribe

ड्रामा क्वीन राखी सावंत मागील अनेक दिवसांपासून तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राखी आणि तिचा पती आदिलबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखी आदिलवर कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप केले होते. शिवाय त्याच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे. आदिल जामीन मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आदिलला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच, राखीने मीडियासमोर येऊन आणखी एक खुलासा केला आहे.

आधी सुहागरात झाली आणि मग लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

दिलला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर राखीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला ज्यात ती म्हणतेय की,”हा न्याय राखीला नाही, तर भारतातील पीडित महिलेला मिळाला आहे. आधी पोलीस कोठडी सुनावली जाते. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत आरोपीची रवानगी होते. पण इतिहासात पहिल्यांदाच उलट घडलं आहे. आधी लग्न होतं मग सुहागरात होते. पण इथे लग्नाआधीच सुहागरात झाली. आदिलला आधी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याला पोलिस कोठडी मिळणं खूप गरजेचं होतं कारण आदिलमुळे माझे खूप नुकसान झाले आहे.” असं राखी म्हणाली.

- Advertisement -

दरम्यान, राखीने आदिलवर विवाह्यबाह्य संबंधाचे आरोप देखील केले होते. शिवाय आदिलने तिचे दागिने, पैसे घेतल्याचे देखील आरोप केले होते.

 


हेही वाचा :

ऍक्शनचा तडका असलेला ‘फेमस’ चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -