Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन भाईजानच्या शत्रूंचे डोळे फुटावेत... सलमानला मिळालेल्या धमकीवर राखीची प्रतिक्रिया

भाईजानच्या शत्रूंचे डोळे फुटावेत… सलमानला मिळालेल्या धमकीवर राखीची प्रतिक्रिया

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारी ड्रामा क्वीन राखी सावंत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सध्या रमजानच्या महिन्यात उपवास करत आहे. यादरम्यान तिने आपल्या मित्रांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला असून यात राखी काही पत्रकारांशी संवाद साधताना दिसत आहे. यावेळी राखी तिचा भाईजान अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सलमानला मिळालेल्या धमकीवर राखीने दिली प्रतिक्रिया

नुकत्याच काही दिवसांपूर्वी सलमान खानला ईमेलद्वारे जीवे मारण्याच्या धमकीचा एक मेल आला होता. ज्याबाबत आता राखीने सलमानची बाजू घेत प्रतिक्रिया दिली आहे. यात राखी म्हणतेय की, सलमान खान एक उमदा व्यक्ती आहे. तो गरिबांचा दाता आहे. तो एक महापुरुष आहे. सलमान भाईसाठी प्रार्थना करा, तो लोकांसाठी खूप काही करतो. मला वाटतं सलमान भाईच्या शत्रूंचे डोळे फुटावेत. त्याची स्मरणशक्ती कमी होवो. माझा भाऊ सलमानबद्दल कोणीही वाईट विचार करू नये, अशी मी अल्लाहला प्रार्थना करते. एवढेच नाही तर, राखी सावंतने बिश्नोई समाजाची माफी मागितली. हात जोडून ती सलमान खान भाईच्या वतीने बिश्नोई समाजाची माफी मागते. सलमानवर वाईट नजर ठेवू नका. त्यांना लक्ष्य करू नका. असंही ती व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.

- Advertisement -

राखी सावंतने सलमान खानविरोधातील मुलाखतींवर आपले मत मांडले आहे. ती म्हणाली, “जे लोक सलमान भाईच्या विरोधात मुलाखती देत ​आहेत त्यांना मी हे सांगू इच्छिते की त्यांनी तुमचे काय बिघडवले आहे. तुम्ही माझ्या भावाच्या वाईटावर का आहात? तो खूप चांगला व्यक्ती आहे. कृपया त्यांना त्रास देणं थांबवा. सलमान भाऊ खूप श्रीमंत आहे पण तो लोकांसाठी सर्व काही करतो. त्याने माझ्या आईसाठी खूप काही केले आहे.” असं राखी म्हणाली.

 


हेही वाचा :

प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -