RakshaBandhan:बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहिण भावंडाची जोडी तुम्हाला माहिती आहे का

सर्वसामान्यांपासून ते सेलेब्रिटीपर्यंत हा सण खूप खास असतो.

2021-bollywood celebs brother sister
RakshaBandhan:बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहिण भावंडाची जोडी तुम्हाला माहिती आहे का

रक्षाबंधन हा सण यंदा 21 ऑगस्ट रोजी देशभरात साजरा केला जात आहे. दरवर्षी सर्वसामान्यांपासून ते सेलेब्रिटीपर्यंत हा सण खूप खास असतो. बॉलिवूडमधील अनेक हस्ती नेहमी एका कुटुंबात एक साथ राहतात. आज आपण या इंडस्ट्रीतील काही भाऊ-बहिणींच्या जोडीबद्दल जाणून घेणार आहोत. ही जोडी माध्यमासोर तसेच सोशल मीडियावर क्वचितच एकत्र दिसतात.(rakhsha bandhan 2021-bollywood celebs brother sister)

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि टोनी कक्कर, सोनू कक्कर या तिघांनी मिळून रसिकांना त्यांच्या गाण्याने गुंग केले असून अनेकदा रियालिटी शोच्या माध्यमातून तिघे बहिण भावंड एकत्र दिसतात.

अभिनेता सैफ अली खान आणि सोहा अली खान व्यतिरिक्त त्यांना आणखी एक बहिण आहे. तिचे नाव सबा अली खान असून सबा लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

हर्षवर्धन, रिया कपूर आणि सोनम कपूर हे तिघही भावंड सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असतात.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर स्पेशल बॉन्ड शेअर करतात. दोघेही केवळ पार्टी आणि काही खास सेलिब्रेशनच्या वेळेसचं एकत्र आढळून येतात.

अभिनेता अभिषेक बच्चनची मोठी बहिण श्वेता नंदा चित्रपटसृष्टीपासून दूर जरी असली तरी नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असते.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिची बहिण शाहीन भट्ट एकसारख्या दिसतात. दोघेही नेहमीच सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत आपले प्रेम व्यक्त करतात.


हे हि वाचा- रणबीरने वेगळ्या अंदाजात अलियाला केली Kiss, पाहा व्हायरल अनसीन फोटो