Homeमनोरंजनलग्नासाठी रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी गोव्यात

लग्नासाठी रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी गोव्यात

Subscribe

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी सध्या चर्चेत आहे.  हे कपल लवकरच विवाहबंधनात अडणार आहेत. रकुल प्रीत सिंग येत्या २१ फेब्रुवारीला गोव्यामध्ये जॅकी भगनानीसोबत लग्न करणार आहे. सध्या या कपलचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू आहेत. अशातच लग्नासाठी हे कपल शनिवारी रात्री गोव्यामध्ये दाखल झाले. गोवा एअरपोर्टरील या कपलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचा लूक

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी शनिवारी रात्री गोवा एअरपोर्टवर पोहचले. यावेळी दोघेही कूल लुकमध्ये दिसले. रकूलने ऑरेंज कलरचे ब्लेझर, पिंक कलरचे ब्लालेट आणि व्हाइट कलरचे स्नेकर्स घातले होते. तर जॅकी भगनानीने ग्रे कलरचा प्रिंटेट शर्ट आणि ब्लॅक कलरची पँट परिधान केली होती. या लूकमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत होते. यावेळी एअरपोर्टवर असलेल्या दोघांच्याही चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

 लग्नासाठी गोव्याला जाण्यापूर्वी रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांनी पूजा देखील केली. यावेळी दोघेही खूपच क्युट दिसत होते. त्यांचा यावेळीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. रकुलने पिंक कलरचा एथनिक ड्रेस परिधान केला होता. तर जॅकीने पिस्ता कलरचा कुर्ता आणि पँट परिधान केली होती. कारमधून उतरून हे जोडपे मंदिरात दाखल झाले. या जोडप्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

 गोव्यात पार पडणार विवाह

दरम्यान रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी गोव्यातील मित्र परिवार आणि कुटुंबीयांमध्ये इको-फ्रेंडली लग्न करणार आहेत. 19 फेब्रुवारीपासून त्यांच्या लग्नसोहळ्याच्या विधींना सुरूवात होणार आहे. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा 21 फेब्रुवारीला पारंपारिक विवाह होणार आहे. रकुल आणि जॅकी लग्नानंतर 22 फेब्रुवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन आयोजित करणार आहेत. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीतील बडे स्टार्स हजेरी लावू शकतात. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांचे नात्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. यानंतर हे जोडपे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसू लागले.

लॉकडाऊनमध्ये प्रेमकहाणी सुरू झाली

रकुल आणि जॅकीची प्रेमकहाणी कोविडच्या काळात सुरू झाली हे फार कमी लोकांना माहीत आहे. लॉकडाऊन दरम्यान दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांनी 2022 मध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती. रकुलनं सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करून जगासमोर जॅकीसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. रकुल आणि जॅकी यांनी यापूर्वी परदेशात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नरेंद्र मोदीनं डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातीलचं ठिकाणे निवडा, असे आवाहन केल्यानंतर त्यांनी मायदेशी लग्न करण्याचं ठरविलं. आता चाहते त्यांच्या भव्य लग्नाची वाट पाहात आहेत.